Disagreements among Shrigonda market committee directors 
अहिल्यानगर

श्रीगोंदा बाजार समिती संचालकांत या कारणामुळे पडली दुफळी

संजय आ. काटे

श्रीगोंदे: बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी त्यांचा पगार परस्पर वाढविल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरुन संचालक मंडळाने बहुमताने त्यांना निलंबित केले होते. त्यांनी त्याविरुध्द पणन संचालकांकडे अपिल करीत निलंबन स्थगित केले.

आता त्यावर सुनावणी सुरु असून डेबरे यांचे निलंबनाबाबत आता संचालक मंडळात फूट पडली आहे. त्याबद्दल कुणी स्पष्ट बोलत नसले तरी गु्प्त बैठकीत फुटीची ठिणगी पडली आहे.

बाजार समितीतील सभापती व उपसभापती निवडीचे राजकारण संपले. माजी आमदार राहूल जगताप यांची मदत घेवून संजय जामदार हे सभापती झाले. मात्र आता तेथील सत्ता ते सांभाळतात की अजून दुसरे कोणी संचालक असा प्रश्न पुढे येत आहे.

कारण सचिव डेबरे यांना पदावरुन हटविण्यासाठी सगळ्या संचालकांची एकी झाली. त्यांनी पगार परस्पर वाढवितानाच अनेक घोटाळे घातल्याचा आरोप करीत संचालकांनी त्यावेळी आगपाखड केली यात बाळासाहेब नाहाटा आघाडीवर होते.

निलंबित सचिव डेबरे यांनी त्यांचे निलंबत पणन संचालकाकंडून स्थगिती मिळविली. त्यामुळे संचालक मंडळ तोंडावर आपटले. आता जे संचालक डेबरे यांना विरोध करीत होते तेच त्यांच्या बाजून उभे असल्याचे आतील चित्र आहे.

पणन संचालकांकडे सुरु असणाऱ्या सुवानणीची पुढची तारीख 7 सप्टेंबर असून त्यापुर्वी संचालकांनी काय निर्णय घ्यायचा याबाबत काल बुधवारी समितीच्या कार्यालयात काही संचालकांनी बैठक झाली.

या बैठकीला ठराविक संचालक उपस्थितीत होते. मात्र तीत मतभेद चव्हाट्यावर आले. काही संचालकांनी बैठकीतून वाॅकआऊट केले. त्यामुळे आता डेबरे हेच पुन्हा बाजार समितीत सचिव राहतील, अशी स्थिती आहे. 


डेबरे यांना पुन्हा नो एन्ट्री
डेबरे यांनी समितीत घोटाळे घातले आहेत. त्यांना नियमानूसार आम्हीच निलंबीत केले आहे. त्यांना पुन्हा समितीत घेणार नाही. 
-संजय जामदार, सभापती 

जे संचालक सचिवांना विरोध करीत होते त्यातील काहींना ते संस्थेचे हित पाहणारे वाटत आहेत. यात मोठे गौडबंगला आहे. मी व माझ्या विचाराचे संचालक सगळा घोटाळा बाहेर काढू. 
- उमेश पोटे, संचालक

माझे निलंबन नियमबाह्य पध्दतीने केलेले आहे. त्यामुळे आपण त्याला स्थगिती आणली. मला संचालक मंडळाच्या भुमिकेबाबत काहीही बोलायचे नाही. 
- दिलीप डेबरे, सचिव बाजार समिती. 
 

संपादन  - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT