Disputes over agricultural land will be resolved by the revenue department 
अहिल्यानगर

शेतीच्या बांधावरून होणारे भावकीचे वाद महसूल विभाग मिटवणार

अमित आवारी

अहमदनगर ः अनेकांना जमिनीविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात सैनिक व माजी सैनिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जमीनविषयक समस्या सोडविण्यासाठी 7 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान अहमदनगर जिल्हा महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येत आहे.

राज्यात प्रथमच अशा प्रकारचे अभियान नगर जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचा दावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला. 

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की सप्तपदी अभियानात रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई, तुकडेजोड तुकडे बंद, स्मशानभूमिसाठी जागा, पोटखराबा "अ' (लागवाडीस अयोग्य जमीन) असलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून त्या लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे, महाराजस्व अभियानांतर्गत पाणंद व शिवरस्ते खुले करणे, खंडकऱ्यांना जमिनी मिळवून देणे, महाआवास योजनेतून घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, या सात विषयांचा समावेश आहे. 

महसूल विभागाला ही कामे सोडविता आली नसल्याने, ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात महसूल विभागाचे अधिकारी एकाच वेळी जमिनीच्या समस्या सोडवतील. जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या शेतजमिनीच्या अडचणी माजी सैनिक कार्यालयाने माझ्यासमोर मांडल्या होत्या.

महाराजस्व अभियानातील अडचणींची संख्या जास्त आहे. ही बाब लक्षात घेऊन हे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्‍याला उपजिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्‍त केले आहेत.

शिवाय प्रत्येक तालुक्‍यात एक पथक स्थापन केले आहे. जिल्ह्यात 16 ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याचे डॉ. भोसले म्हणाले. 

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील, महसूल विभागाच्या चिटणीस माधुरी आंधळे, तहसीलदार सुनीता जऱ्हाड, तहसीलदार वैशाली आव्हाड आदी उपस्थित होते.

अख्खं गाव पोटखराब्याचे! 
भांबोरे (ता. कर्जत) हे संपूर्ण गाव पोटखराब्याचे आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही. ही समस्या ज्या ठिकाणी आहे, तेथे या अभियानातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT