Distribution of 1st and 2nd admission forms for tribal students has started
Distribution of 1st and 2nd admission forms for tribal students has started 
अहमदनगर

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 1 ली, 2 रीचे प्रवेश अर्जांचे वाटप सुरु; पालकांना आवाहन

अण्णा काळे

अकोले (अहमदनगर)  : आदिवासी विकासविभाग अंतर्गत प्रकल्प कार्यालय राजूर यांच्या मार्फत इयत्ता १ ली व २ री प्रवेशासाठी प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय राजूर येथे २५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत अर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी आदिवासी विद्यार्थी व पालकांनी आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे, असे आव्हान आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. संतोष ठुबे यांनी केले आहे.

प्रवेश फॉर्म घेताना प्रकल्प कार्यालय, शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह येथून प्राप्त  केलेलेच फॉर्म स्वीकारले जातील. झेरॉक्स फॉर्म ग्राहय धरण्यात येणार नाही, हे फॉर्म विनामूल्य उपलब्ध आहेत. पालकांनी फॉर्म सोबत जन्मनोंदीचा दाखला जोडावा. सदरचे प्रवेश फॉर्म इ. १ ली व २ री करीता सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ९. ४५ ते सायंकाळी ६. १५ या वेळेत उपलब्ध होतील. प्रवेशाकरिता फॉर्म सोबत इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रहिवासी दाखला, पालकांचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, तहसिलदार यांचा सन २०२०- २१ चा उत्पन्नाचा दाखला, दारिद्रय रेषेचा ग्रामसेवकांनी दिलेला दारिद्र्य रेषेखाली असल्याचा पालकपुरावा जोडावा.

सदरचे प्रवेश फॉर्म २०२०-२१ चा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही, याबाबतचे हमीपत्र द्यावे लागेल. १ली व २ री च्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे. इयता १ ली व २ री करीता शहरातील नामांकीत प्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत इंग्रजी शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. 

अपूर्ण, उशिरा पाठवलेले अर्जाची निवड होणार नाही. तसेच विद्यार्थ्याचे पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे हमीपत्र लिहून द्यावे लागेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा बदलता येणार नाही, याबाबत हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT