Distribution of foodgrains to the disabled beneficiaries through self-reliance scheme 
अहिल्यानगर

दिव्यांग लाभार्थींना होणार आत्मनिर्भर योजनेतून धान्यवाटप

आनंद गायकवाड

संगमनेर ः लॉकडाउनमुळे अनेकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. त्यामुळे घरातील चूल पेटणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गोरगरिबांना विविध प्रकारे मदत देण्यास सुरूवात केली आहे. अनाथ, पथविक्रेते, दिव्यांग, आदिवासींसाठी या योजना आहेत. या योजनांमार्फत त्यांच्या घरातील चूल पेटावी अशी व्यवस्था सरकारने केली आहे. दिव्यांगासाठी आत्मनिर्भर योजना आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने तालुक्‍यातील दिव्यांग लाभार्थींसाठी धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

तालुक्‍यातील दिव्यांग व्यक्तींसाठी आत्मनिर्भर योजनेमधून ऑगस्टपासून धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तालुक्‍यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, राष्ट्रीय संस्था, तसेच विविध सामाजिक संस्था आणि समाजकल्याण विभागाकडून घेऊन धान्यवितरण करण्यात येईल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधून कोणताच लाभ मिळत नसलेल्या या लाभार्थींना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू महिन्यापासून तत्काळ लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

पात्र लाभार्थींनी जवळचे शासकीय धान्यवितरण केंद्र किंवा संगमनेर तहसील कार्यालयात पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT