Divisional Commissioner happy with Nagar Zilla Parishad 
अहिल्यानगर

विभागीय आयुक्त नगर जिल्हा परिषदेवर खुश

सकाळ वृत्तसेवा

नगर: नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत, कामकाजाची माहिती घेतली. अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, घरकुलांच्या मुद्द्यावरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. 

जिल्हा परिषदेत आज सायंकाळी विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना यांचा आढावा घेतला. त्यात गतवर्षीची कामे अपूर्ण असून, यंदा मंजूर उद्दिष्टापैकी, निधी येऊनही पहिला हप्ता न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

तसेच, जागेअभावी घरकुलांची कामे रखडणार नाहीत, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना सूचना केल्या. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शासकीय जागा, गायरान जागा घरकुलांसाठी तातडीने मंजूर करण्याचे आश्‍वासन दिले. जेथे 50 हजारांत घरकुलासाठी जागा मिळणार नाही, तेथे काही लाभार्थींना एकत्र करून घरकुल उभारण्याची सूचना आयुक्त गमे यांनी केली.

ग्रामपंचायत पातळीवर होणाऱ्या अपहाराची रक्कम भरून घेण्यासोबत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या नियमित वसुलीवर भर देण्यास गमे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT