Nagar sakal
अहिल्यानगर

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

साडेआठ हजार सानुग्रह अनुदान , सर्व लाभ सणापूर्वीच मिळणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर (Nagar) महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त (Diwali) बोनस, सानुग्रह अनुदान, थकीत देणे दिवाळीपूर्वी मिळणार आहे. सानुग्रह अनुदानापोटी साडेआठ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

दिवाळीपूर्वीच ही रक्कम मिळावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली होती. याबाबत महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापौर कार्यालयामध्ये बैठक घेतली. या वेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप पठारे, कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या, की गेल्या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. कोरोनाच्या संकटातदेखील कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यादृष्टीने मनपा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून साडेआठ हजार रुपये व सहाव्या वेतन आयोगातील फरकापोटी एक हप्ता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सर्व रक्‍कम कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या १५ दिवस आधी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत.

कामगार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे म्हणाले, की आमची मागणी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याबाबत होती. तसेच, थकीत देणेदेखील देण्याबाबतची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान व सहाव्या वेतन आयोगाचा एक हप्ता देण्याचे मान्य केल्याने, हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने चांगला आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना आधार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या घरातच आग! निष्ठावंत डावलले, आयात नेत्यांना तिकीट; संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक! सावे-कराडांच्या गाडीला काळं फासलं

Jalgaon Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! एका दिवसात चांदी ७ हजारांनी, सोनं ३ हजारांनी स्वस्त

Latest Marathi News Update : नागपुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन

RailOne Discount Offer : नवीन वर्षात रेल्वे प्रवाशांसाठी खास ऑफर! RailOne अ‍ॅपवर तिकीट बुकिंगवर 3% सूट – जाणून घ्या कधीपासून?

प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासलं; काय घडलं?

SCROLL FOR NEXT