Doctors, lawyers, traders were found gambling in Rahuri 
अहिल्यानगर

राहुरीत जुगार अड्ड्यावर कोण कोण सापडलंय ते तरी वाचा...

सकाळ वृत्तसेवा

राहुरी :देवळाली प्रवरा येथे काल (रविवारी) सायंकाळी एका जुगार अड्ड्यावर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला.

पत्त्याची जुगार खेळतांना तब्बल तीस जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यात, नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील डॉक्टर, वकील, व्यापारी क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती असल्याचे समजते. त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रुपये रोख रक्कम व पत्त्यांचे कॅट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना चार तास गोंधळ सुरू होता. या गोंधळात पोलिसांनी ताब्यात घेतलेला जुगार अड्डा चालविणारा एक आरोपी पोलिस ठाण्याच्या आवारातून पसार झाला.

काल (रविवारी) रात्री उशिरा तीस जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 29 जणांना अटक करून, वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने कारवाई केल्यानंतर तीस आरोपींपैकी एकाचेही वाहन सापडले नाही. अवघे एक लाख दोन हजार रूपये रोख रक्कम मिळाली. त्यामुळे या कारवाईची तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

बापू भास्कर गायकवाड (रा. देवळाली प्रवरा) असे राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे अशी : प्रदीप सुनिल ठोंबरे (वय 23), सचिन गोरख कुल्हाडे (वय 28), प्रशांत चंद्रकांत अल्हाट (वय 23), शाहरुख जावेद शेख (वय 24), आकाश मच्छिंद्र टेमकर (वय 28), दत्तात्रेय रामदास गवळी (वय 38, सर्व सहा जण रा. घोडेगांव ता. नेवासा), चंद्रकांत राजाराम चक्रनारायण (वय 30, रा. कोठा, ता. नेवासा), बापू सूर्यभान तोडमल (वय 43, रा. जेउर बायजाबाई, ता. नगर) मनोहर बहूबल खूबचंदने (वय 60 रा. सिंधी कॉलनी, तारकपूर), राजमहंमद नजीर आत्तार (वय 49, रा. भिंगार), संतोष नामदेव देवकर (वय 45, रा. शेरकर गल्ली, तेलीखूंट, नगर), अर्जुन विठ्ठल परदेशी (वय 58, रा. भिंगार), मधुकर नाथा मोहीते (वय 40, रा. सातभाई गल्ली, नगर), अण्णासाहेब निवृत्ती कराड (वय 30, रा. औरंगाबाद रोड, नगर), पणू उर्फ बाळकृष्ण रामचंद्र टिक्कल (वय 31), सचिन दिलीप घोरपडे (वय -30), अजय रामराव जाधव (वय 35), प्रशांत दत्तात्रेय मुसमाडे (वय 34), अनिस अहमद शेख (वय 38), करीम अहमद शेख (वय 32, सर्व सहाजण रा. देवळाली प्रवरा), किरण प्रभाकर पानपाटील (वय 48, रा. सदर बाजार, भिंगार), हरी महादू दिवटे (वय 55, रा. सिध्दार्थनगर, नगर), प्रकाश रमनलाल शहा (वय 61, रा. आनंदी बाजार, नगर), इमान हनीफ बागवान (वय 35, रा. पाटील गल्ली, भिंगार), निलेश रामदास भोसले (वय 43, रा. गवळीवाडा, भिंगार), बाबासाहेब सार्जन पडांगळे (वय 37, रा. राहुरी फॅक्टरी), बाळू रामदास शिदे (वय 45, रा. तेलीखुंट, नगर), विजय चंदनमल मुनोत (वय 58, रा. विनायकनगर,: नगर), युवराज भाऊसाहेब करंजुले (वय 41, रा. मुकुंदनगर, नगर). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

Ajit Pawar: "वोट चोरीचं खोटं नरेटीव्ह..."; विरोधकांना टोला अन् अजितदादांचा 'गो लोकल'चा मास्टरस्ट्रॉक! राजकारणात खळबळ

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT