Dogs will unravel the mystery at Takli Kadevali 
अहिल्यानगर

टाकळीच्या माळरानावर गावकुत्र्यांनी उकरताच जमिनीतून बाहेर निघाला माणूस!

संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्‍यातील टाकळी कडेवळीत येथील माळरानावर काल (सोमवारी) काही कुत्र्यांमुळे धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावकरी धास्तावले असून पोलिसही चक्रावले आहेत.

हा प्रकार या परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी श्रीगोंदे पोलिसांना माहिती दिली. विशेष म्हणजे, मृतदेहाचे शीर गायब असून, खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जमिनीत मृतदेह पुरला असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. 

टाकळी कडेवळीत येथून काही अंतरावरील माळरानावर शीर नसलेला पुरुषाचा मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली. स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला असता, मृतदेह आढळून आला.

ही बाब लोकांनी पोलिसांना कळविली. तहसीलदार प्रदीपकुमार पवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्षशील राजुळे घटनास्थळी दाखल झाले. पुरलेला मृतदेह बाहेर काढला. मात्र, त्याचे शीर घटनास्थळी आढळले नाही. मृतदेहाच्या अंगावर निळा शर्ट व राखाडी पॅन्ट आहे. 

मृत पुरुष उंच असून, शरीरयष्टी मजबूत आहे. मृतदेहाचे धड घटनास्थळी आढळून आले नसल्याने, हा खुनाचाच प्रकार असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाच्या उत्तरिय तपासणीनंतर वस्तूस्थिती समोर येणार आहे. 

दरम्यान, मृतदेहाच्या गळ्यातील चेन तशीच होती. त्यामुळे पोलिस बारकाईने या प्रकरणाची माहिती घेत आहेत. अपर पोलिस अधीक्षक सौरव अग्रवाल, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना सूचना केल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT