Donate food to five and a half hundred people in the lockdown
Donate food to five and a half hundred people in the lockdown 
अहमदनगर

लॉकडाउनमध्ये वंचितांसाठी धावली लोकपंचायत 

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः कोरोनाच्या स्थितीचा सामना करणाऱ्या गोरगरीब, वंचित घटक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लॉकडाउनमध्ये विविध प्रकारची मदत करण्याचे काम अझीम प्रेमजी फिलांथ्रोपिक इनिशिएटीव संस्थेच्या आर्थिक सहकार्याने लोकपंचायत संस्थेमार्फत सध्या सुरू आहे. 

संगमनेरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. येथील हातावर पोट असलेली कुटुंबे अन्नाला मोताद झाली आहेत. काम नसल्याने रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशा वंचित घटकांसाठी प्राधान्यक्रमाने काम करण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी लोकपंचायत ही संस्था सरसावली आहे. वंचितांची माहिती गोळा करून त्यांना किमान एक वेळचे जेवण पुरवण्याचे काम संस्थेने सुरू केले आहे. यात प्रतिबंधित क्षेत्रातील गरजू लोक आणि शहरालगत असलेले वीटभट्टी कामगार, स्थलांतरित मजूर अशा साडेपाचशे लोकांना एक महिन्यापासून तयार अन्नाची पाकिटे संस्थेमार्फत पुरवली जात आहेत.

तसेच अकोले या आदिवासी दुर्गम पाड्यावरील व सध्या मोलमजुरी नसलेल्या लोकांची स्थितीही लॉकडाउनमुळे बिकट आहे. रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करणारा आदिवासी समाज लॉकडाउनमध्ये रोजगार बुडाल्यामुळे घरीच बसून आहे. त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आपत्तीच्या काळात या लोकांना थोडासा मदतीचा हातभार लागावा, म्हणून वाड्या-वस्त्यांमधील वंचित व गरजू सातशे आणि संगमनेर परिसरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांच्या तीनशे कुटुंबांना जीवनावश्‍यक किराणा, भाजीपाला देण्यात आला.

 यात डाळी, तेल, साखर, मीठ, कांदे, बटाटे, त्याचप्रमाणे साबण आणि मास्क अशा जीवनावश्‍यक वस्तूंचा समावेश आहे. कोरोनाशी खऱ्या अर्थाने लढणाऱ्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची गरज ओळखून, संस्थेने संगमनेर व अकोले तालुक्‍यात मास्क, हॅंडग्लोव्हज, सॅनिटायझर, ऍप्रोन, कॅप, गॉगल अशा 200 संचाचे वाटप करण्यात आले. धांदरफळ, बोटा, चंदनापुरी, जवळे बाळेश्‍वर, तळेगाव आणि जवळे कडलग येथे जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांच्या हस्ते सव्वाशे, तर अकोले तालुक्‍याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यांच्याकडे 75 संच सुपूर्द केले.

या मदतकार्यात लोकपंचायत आणि संलग्न संस्थांचे सर्व कार्यकर्ते कोरोनामुक्तीचा ध्यास घेऊन सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत, अहोरात्र राबत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT