Efforts are underway by senior leader and former MLA Appasaheb Rajale for unopposed selection of Vriddheshwar factory 
अहिल्यानगर

वृद्धेश्वर कारखान्याच्या बिनविरोध निवडीसाठी राजळेंचे प्रयत्न

राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करावी, संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार ज्येष्ठ नेते माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांना देण्यात यावेत, असा ठराव संमत करण्यात आला. कार्यकर्ते, ऊसउत्पादक व सभासद शेतकऱ्यांनी त्याला अनुमोदन दिले. 

पाथर्डी येथील व्हाइट हाऊस येथे आदिनाथ शेतकरी मंडळाचा वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे होते. आमदार मोनिका राजळे, चंद्रकांत म्हस्के, काशिनाथ लवांडे, अर्जुन शिरसाट, अभय आव्हाड, सुरेश आव्हाड, उद्धव वाघ, सुभाष ताठे, माणिक खेडकर, महादेव जायभाये, बाळासाहेब अकोलकर, बाळासाहेब कचरे, मंगल कोकाटे आदी उपस्थित होते. बहुतेक वक्‍त्यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोट बांधावी. 

कारखाना चांगला सुरु आहे. सभासदांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करून, संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांना देण्यात यावेत, असा ठराव मांडला. उपस्थितांनी त्याला हात उंचावून अनुमती दर्शविली. अर्जुन शिरसाट, काशिनाथ लवांडे, चंद्रकांत म्हस्के, उद्धव वाघ यांची भाषणे झाली. प्रास्ताविक हिंदकुमार औटी यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष केकाण यांनी केले तर अभय आव्हाड यांनी आभार मानले. 

सहकारी संस्थांमध्ये राजकारण नको
 
आमदार मोनिका राजळे यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. कारखाना ऊसउत्पादकांची कामधेनू आहे. सहकारी संस्थांमध्ये राजकारण न करण्याची इथली परंपरा जपावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT