Mission Admission sakal
अहिल्यानगर

Eleventh Admission : अकरावी अ‍ॅडमिशन, नो टेन्शन; तब्बल २० हजार ९०० जागा रिक्त

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांना सर्वाधिक चिंता भेडसावते ती अकरावीच्या प्रवेशाची. मात्र, त्यांना टेन्शन घ्यायचे कारण नाही. तब्बल २० हजारांवर जास्तीच्या जागा आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांना सर्वाधिक चिंता भेडसावते ती अकरावीच्या प्रवेशाची. मात्र, त्यांना टेन्शन घ्यायचे कारण नाही. तब्बल २० हजारांवर जास्तीच्या जागा आहेत. परिणामी, त्या शिल्लक राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ६६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर ७६ हजार जागा होत्या. त्या सर्व भरून तब्बल २० हजार ९०० जागा रिक्त राहिल्या. यात सर्वाधिक जागा आर्ट्‌स शाखेच्या होत्या.

दहावीसाठी जिल्ह्यातून एकूण ६७ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केले होते. त्यापैकी ३५ हजार १६४ विद्यार्थी व २८ हजार ९६८ विद्यार्थिनी असे एकूण ६४ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ८५ हजार १८९ जागा उपलब्ध आहेत. एकूण ८५ हजार १८९ जागांपैकी सुमारे ३८ हजार जागा विज्ञान शाखेसाठी आहेत. सुमारे ३२ हजार जागा कलासाठी, तर १५ हजार जागा वाणिज्यला आहेत.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • अर्जवाटप व स्वीकृती - ७ ते १४ जून

  • अर्जछाननी - १५ ते १६ जून

  • सर्वसाधारण गुणवत्ता यादी - १७ जून

  • पहिली गुणवत्ता यादी - २० जून

  • पहिल्या यादीनुसार प्रवेश - २१ ते २६ जूनपर्यंत

  • दुसरी गुणवत्ता यादी - २७ जून

  • दुसऱ्या यादीनुसार प्रवेश - २८ ते ३ जुलै

  • तिसरी गुणवत्ता यादी - ४ जुलै

  • तिसऱ्या यादीनुसार प्रवेश - ५ ते ८ जुलै

  • जागा शिल्लक असल्यास प्रवेश - ९ ते १४ जुलै

जिल्ह्यातील तुकड्या

जिल्ह्यात एकूण ४६८ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांत कला शाखेच्या ३७२, वाणिज्य शाखेच्या १७२, तर विज्ञान शाखेच्या ४९५, याशिवाय संयुक्त ३२ व ९ व्होकेशनल ९, अशा एकूण ११३९ मंजूर तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ८५ हजार १८९ विद्यार्थ्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT