In the open market, the price of a trumpet is six and a half thousand rupees 
अहिल्यानगर

वर्धमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत अपहार, अध्यक्षांसह चौदाजणांवर गुन्हा

मार्तंड बुचुडे

पारनेर ः ः वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ढवळपुरी येथील शाखेत 8 लाख 56 हजार 215 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले.

या बाबत पारनेर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 3) संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र काले यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

संस्थेचे संचालक राजकुमार काले (श्रीरामपूर), अध्यक्ष जयेंद्र काले, बबनराव घोरपडे, मुरलीधर सायकर (रा. शिर्डी), पारसमल कांकरिया, विठ्ठलराव गोरे, सुरेश नाबरिया, प्रकाश राऊत, मुकुंद कुलकर्णी, शंकर जाधव, नानासाहेब अभंग, चंद्रकांत धीवर (सर्व रा. वाकडी), हिराबाई सहाणे (रा. साकुरी, ता. राहाता), शाखाधिकारी अशोक बिडे (रा. ढवळपूरी, ता. पारनेर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

याबाबत सहकारी संस्थेच्या फिरत्या पथकाचे प्रमुख व लेखापरीक्षक शिरीष कुलकर्णी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, वाकडी (गणेशनगर, ता. राहाता) येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ढवळपुरी येथील शाखेत 2013-14मध्ये 8 लाख 56 हजार 215 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले.

या काळात ठेवतारण कर्जप्रकरण, वाहनतारण कर्ज, बचत खात्यात कमी रक्कम जमा करणे किंवा जमा नसताना रक्कम अदा करणे, अशा प्रकारे संस्थेची फसवणूक करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT