Encroachments in Ahmednagar will be removed 
अहिल्यानगर

नगरमधील अतिक्रमणे होणार भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः ""पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढ्या-नाल्यांच्या सफाईचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाने सुरू केले आहे. ओढ्या-नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणारी अतिक्रमणे सक्‍तीने काढण्यात येतील,'' असे महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.

महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे ओढ्या-नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. काल (मंगळवारी) तीन पोकलेनद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले. त्यात निर्मलनगर येथील भगवानबाबा चौकाजवळील ओढा, गुलमोहर रस्ता, मार्कंडेय सोसायटी परिसरातील ओढा व जुन्या आरटीओ कार्यालयासमोरील नाल्याच्या सफाईचे काम पूर्ण झाले.

दोन दिवसांत आणखी दोन पोकलेनद्वारे काम करण्यात येणार आहे. ओढ्या-नाल्यांत, गाळ, गवत, झाडे-झुडपे वाढली आहेत. ती हटवून नैसर्गिक प्रवाह खुला करण्यात येत आहे. शहरात मोठे ओढे-नाले 21 आहेत. शिवाय नाले, बंद गटारे, भुयारी गटारीसुद्धा पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्याचे नियोजन आहे, असे इथापे यांनी सांगितले. 

शहरासह उपनगरांतील ओढ्या-नाल्यांत भराव टाकून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ती हटविल्यास पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होणार नाही. गेल्या वर्षी शहरातील उपनगरांच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT