पारनेरमध्ये कोरोना चाचणी ई सकाळ
अहिल्यानगर

पारनेरमध्ये प्रत्येकाचीच होणार कोरोना टेस्ट, तहसीलदारांचा निर्णय

साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेर शहरात प्रत्येक प्रभागात व घरोघर जाऊन प्रत्येकाची कोरोना टेस्ट (corona test) करण्याचा निर्धार तहसीलदार ज्योती देवरे (jyoti deore) यांनी केला आहे. महसूल विभाग, नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमातून पारनेर शहर (parner city) कोरोनामुक्त करण्याचा संकल्प आज (ता. १३ ) तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोडला. शहरात टेस्टिंग मोहिमेला सुरूवातही झाली आहे. सकाळपासून २००जणांची तपासणी झाली आहे. त्यात २० बाधित आढळून आले. (Everyone in Parner will have a corona test)

पारनेर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अनेक दिवसांपासून तीनशेच्या आसपासच आहे. रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. त्यातच पारनेर शहरासह सुपे, गोरेगाव, टाकळी ढोकेश्वर, हंगे, कान्हूर पठार या गावातील रूग्ण संख्या वाढतेच आहे. पारनेर शहरातसुद्धा ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

याचा विचार करून तहसीलदार देवरे यांनी पारनेर शहर कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या सहकार्याने शहरातील प्रभागनिहाय कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज या उपक्रमाची सुरूवात भैरवनाथ गल्लीवरच्या वेशीपासून करण्यात आली. या वेळी त्यांनी किराणा साहित्य, भाजीपाल किंवा इतर कामासाठी जा-ये करणारे तसेच विनाकारण फिरणा-यांनाही अडवून त्यांची कोरोना टेस्ट केली.

शहरातील लोकांच्या जीवासाठीच...

तालुक्यात तसेच शहरातही अनेक दिवसांपासून कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. अनेकांवर दंडात्मक कारवाई करूनही कोरोनाची रूग्ण संख्या फारशी कमी होताना दिसत नाही. मृ्त्यू दरही वाढतच आहे. शहरातील रूग्ण संख्या कमी व्हावी, शहर कोरोनामुक्त व्हावे, या साठी आता प्रभागनिहाय व घरोघर जाऊन कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. शहरात एकही रूग्ण उपचाराविना व घरात राहाणार नाही. त्यामुळे कोरानाचा प्रसारही थांबेल. त्यामुळे शहर कोरोना मुक्त होईल.

-ज्योती देवरे, तहसीलदार.

(Everyone in Parner will have a corona test)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT