The executive committee of Bharatiya Janata Yuva Morcha North Ahmednagar has been announced 
अहिल्यानगर

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहमदनगर येथील कार्यकारणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : भाजपामधील युवा कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष अँड. श्रीराज डेरे यांनी केले. मंगळवारी जाहीर केलेल्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी ते बोलत होते. 

भारतीय जनता पक्षाचा विकासवेधी विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने, कालसुसंगत पावले उचलली जात आहेत. त्यानुसार मंगळवारी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीत सर्व तालुक्यातील विविध क्षेत्रात व भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारणीमध्ये संधी देण्यात आली.

यानुसार सरचिटणीसपदी योगीराजसिंग (भैय्या) परदेशी (संगमनेर), विशाल यादव (श्रीरामपूर), सुनिल उगले (अकोले), नरेश सुराणा (शिर्डी) यांची उपाध्यक्षपदी रुपेश हरकल (श्रीरामपूर), रोहित वाकचौरे, रवींद्र कोते, सागर कापसे व शंकर गोंदकर ( राहाता ), मंगेश शिंदे, कल्पेश पोगुल व राहुल दिघे ( संगमनेर ), शरद जाधव, अँड. स्वप्नील सोनवणे व सुभाष पवार ( नेवासे ) तसेच सिध्दार्थ साठे ( कोपरगाव ) यांची
नियुक्ती करण्यात आली.

भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते डॉ.भानुदास डेरे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड व बाळासाहेब मुरकुटे यांनी कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT