The factories in Shrigonde taluka have crushed 16 lakh tonnes of sugarcane 
अहिल्यानगर

श्रीगोंद्यातील कारखान्यांचे 16 लाख टन ऊस गाळप; नागवडे, कुकडी कारखान्यांना कमी क्षमतेच्या 'साजन शुगर'ची टक्कर

संजय काटे

श्रीगोंदे (अहमदनगर ) : तालुक्‍यातील तीन साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. नागवडे, कुकडी व साजन शुगर या कारखान्यांनी आतापर्यंत 15 लाख 67 हजार टन उसाचे गाळप केले. गाळपात नागवडे कारखाना, 'कुकडी' पुढे असून, या दोन्हींच्या मानाने कमी क्षमता असणाऱ्या 'साजन शुगर'नेही यंदा त्यांना चांगली टक्कर दिली आहे.
 
तालुक्‍यातील चारपैकी तीन साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊन जवळपास पावणेपाच महिन्यांचा काळ लोटला आहे. तालुक्‍यात गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र मोठे होते. त्यापैकी जवळपास सोळा लाख टन उसाचे गाळप स्थानिक कारखान्यांच्या वाट्याला आले. चार लाख टनांच्या आसपास ऊस बाहेरच्या कारखान्यांनी उचलला. त्यातच येथील कारखान्यांनीही कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस आणला आहे.

देसवड्यात दुचाकी चोरणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले; गुन्हा दाखल
 
नागवडे कारखान्याने बुधवारपर्यंत (ता. 17) सहा लाख 73 हजार 140 टन, कुकडी कारखान्याने सहा लाख 27 हजार 300, तर 'साजन शुगर'ने दोन लाख 67 हजार टन उसाचे गाळप केले आहे. गाळप व उताऱ्यात नागवडे कारखान्याची आघाडी आहे. त्याचा 10.84 टक्के, 'कुकडी'चा 10.18 टक्के, तर 'साजन शुगर'चा उतारा 10.5 टक्के आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, नागवडे व कुकडी कारखान्यांचे प्रत्येकी सात लाख टनांपेक्षा जास्त गाळप होईल, अशी अपेक्षा आहे. 

'साजन' दरात मागे राहणार नाही 

(स्व.) सदाशिव पाचपुते यांनी सुरू केलेल्या पूर्वीच्या साईकृपा व आताच्या साजन शुगर कारखान्याने क्षमतेच्या तुलनेत यंदा गाळपात चांगली बाजी मारली आहे. कारखान्याचे अध्यक्ष साजन पाचपुते म्हणाले, यंदा पहिल्यांदाच तीन लाख टन उसाचे गाळप होणार आहे. शिवाय, इतरांच्या तुलनेत दराबाबत मागे राहणार नाही. सदाअण्णांना हीच आदरांजली ठरणार आहे.'
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT