loan waivers for farmers  esakal
अहिल्यानगर

कर्जमाफी किती मिळणार? योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सकाळ वृत्त सेवा

जामखेड (जि. अहमदनगर) : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या कामाला पुन्हा सुरवात झाली असून, जिल्हा बँकेचे जामखेड येथील संचालक अमोल राळेभात यांच्या पाठपुराव्याला अंशतः यश आले आहे. मात्र, प्रत्यक्षात पात्र असलेल्या सर्व थकीत कर्जदारांना या योजनेचा लाभ नेमका किती दिवसांत मिळणार, याकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


कर्जखाते थकीत, कर्जरकमेला व्याजआकारणी मात्र सुरू

महात्मा जोतिराव फुले शेतकरी 'कर्जमुक्ती योजने'चे कामकाज काही दिवसांपासून बंद झाल्याने जामखेड तालुक्यातील सहाशे अकरा सभासदांना तब्बल तीन कोटी 74 लाख 18 हजार रुपये कर्जमुक्तीची रक्कम मिळालेली नाही. कर्जमुक्ती जाहीर झाल्यापासून या शेतकऱ्यांचे कर्जखाते थकीत आहे. मात्र, कर्जरकमेला व्याजआकारणी सुरू आहे. त्यामुळे पात्र असूनही त्या शेतकऱ्यांना आजतागायत कर्जमुक्तीची प्रतीक्षा करावी लागलेली आहे.
या काळात थकीत रकमेचे व्याज मात्र सुरू आहे. व्याजाची रक्कम वाढत चालली असून, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम सभासद शेतकऱ्यांच्या खाती जमा होऊन त्याला कधी कर्जमुक्ती मिळते, याकडे संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
यासंदर्भात संबंधित खातेदार विविध कार्यकारी सेवा संस्था, बँक व बँकेच्या संचालकांकडे कर्जमाफी कधी होणार याची विचारपूस करीत आहेत.

दरम्यान, येथील जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी जामखेड तालुक्यातील, कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेल्या सभासदांची माहिती उपनिबंधक, जिल्हा निबंधक यांच्याकडे कळविली असून, सहकारमंत्र्याकडे संबंधित पात्र शेतकऱ्यांची तत्काळ कर्जमाफी करावी आणि त्यांचे थकीत कर्जखाते नियमित सुरू व्हावे याकरिता महिनाभरापूर्वी पत्राद्वारे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अंशतः यश आले आहे. कर्जमुक्ती योजनेचे बंद पडलेले कामकाज पुनश्च सुरू करण्याचे निर्देश बँकेला प्राप्त झाले आहेत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही, त्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच कर्जमाफीच्या रकमा संबंधित सभासदांच्या बँक कर्जखाती जमा होणार आहेत. तसेच, ज्या सभासदांची नावे पोर्टलवर अपलोड झालेली नाहीत, अशा सभासदांची यादी लवकरच अपलोड होणार असल्याचे संबंधित विभागाने बँकेला कळविले आहे.



"अहमदनगर जिल्हा बँकेअंतर्गत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे बंद पडलेले कामकाज पुनश्च सुरू करण्यात आलेले आहे. त्यानुसार अपलोड यादीत जिल्ह्यातील ८२४ सभासदांचे आधार प्रमाणीकरण पेंडिंग असून, त्या सभासदांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम सभासदांच्या बँक कर्जखाती जमा होणार आहे. तसेच, ज्या सभासदांची नावे पोर्टलवर अपलोड झालेली नाहीत, अशा सभासदांची यादी लवकरच अपलोड होणार आहे. कर्जमुक्ती योजनेचे ठप्प झालेले कामकाज पुन्हा सुरू झाले आहे." - अमोल राळेभात, संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT