Farmers' Bhenda to Kukane tricolor tractor rally has been held at Nevasa.jpg
Farmers' Bhenda to Kukane tricolor tractor rally has been held at Nevasa.jpg 
अहमदनगर

शेतकऱ्यांची भेंडा ते कुकाणे तिरंगा ट्रॅक्टर रॅली; अखिल भारतीय किसान सभेचे आयोजन

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी मंगळवार दिल्लीत निघालेल्या शेतकऱ्यांच्या तिरंगा रॅलीला सक्रिय पाठिंबा म्हणून नेवासे तालुका अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने भेंडे ते कुकाणे अशी तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढली.

किसान सभेचे नेते बाबा आरगडे, ऍड. बन्सी सातपुते, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अंकुश कानडे, शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा ट्रॅक्टर रॅलीचा प्रारंभ भेंडे येथील बसस्थानक परिसरातून झाला. तर कुकाणे येथे पोहचल्यानंतर पोलिस मैदानावर सभा झाली. त्यात बाबा आरगडे, कानडे, सातपुते यांची भाषणे झाले. 

यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात 'सध्या दिल्लीच्या सगळ्या सिमावर दोन महिन्यापासून शेतकरी ठिया आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी दखल घेत नाही. आजपर्यंत या आंदोलनात 200 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. त्यामुळे दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय सभेच्या नेवासा वतीने शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यात यावे व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत असे म्हंटले आहे.
 
आंदोलनात ज्येष्ठ नेते आपसाहेब वाबळे, बाळासाहेब जावळे, बंडू आरगडे यांच्यासह एकूण २५ ट्रॅक्टर व शेकडो शेतकरी सहभागी होते. रॅलीची सांगता भेंडे बसस्थानक परिसरात झाली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT