The farmer's daughter fights with the enemy at the border
The farmer's daughter fights with the enemy at the border 
अहमदनगर

शेतकऱ्याच्या मुलीची चीन-पाकिस्तानसोबत फाइट!

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः आता असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. सैन्य दल तर केवळ पुरूषांचीच मक्तेदारी असायचे. आता त्यात महिला कमांडोही दिसत आहेत. रांधे गावातील शेतकऱ्याची मुलगी शत्रूसोबत फाईट करताना दिसणार आहे. 

वैशालीचे शिक्षण पहिली ते दहावी लोणीमावळा या गावात झाले. अकरावी ते बारावीचे शिक्षण तिने वडझिरे गावात पूर्ण केले. पुढील शिक्षण अळकुटी गावातील विद्यालय गाठले. सध्या तिचे एम.ए.चे शिक्षण सुरू आहे. 

तिची सुरवातीपासुन सैन्यदलात भरती होण्याची 
जिद्द होती. ती तिने पूर्ण केली. शेतकऱ्याची पोर नांगरासोबत आता हाती बंदूक धरून देशाचे संरक्षण करणार आहे.

रांधे (ता.पारनेर) येथील वैशाली गेणभाऊ आवारी सैन्यात राष्ट्रीय सीमासुरक्षा दलासाठी असणारी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती भारताच्या सीमेवरील सुरक्षा विभागात रूजू होणार आहे. सैन्यात भरती होणारी गावातील ती पहिली मुलगी आहे. याबद्दल ग्रामस्थांनी तिचा सन्मान केला.

या वेळी माजी उपसरपंच संतोष काटे, भगवान पावडे, संतोष लामखडे, विनोद फापाळे, प्रवीण साबळे, संतोष साबळे, साईनाथ झिंजाड उपस्थित होते.

संपादन -अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT