Farmers find solutions to save onion seeds 
अहिल्यानगर

कांदा बी, रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी शोधले जुगाड, वेळेसह वाचेल पैसाही

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः यंदा परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह कांदारोपांचे मोठे नुकसान झाले. कांदारोपांची नासाडी झाल्याने, पुन्हा रोपे टाकून लागवडीऐवजी थेट कांदापेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच कांदापेरणी वाढल्याने तालुक्‍यातील कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे.

मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने रब्बी हंगामाला उशीर झाला. सध्या कांदापेरणीची लगबग सुरू आहे.

प्रारंभी महागड्या दराने घेतलेले कांदाबियाणे सततच्या पावसामुळे खराब झालं. शेतात साचलेले पाणी, ढगाळ हवामानामुळे कांदारोपे खराब झाली. आता कमी खर्चात कांदापेरणीसाठी यंत्राची मागणी वाढली आहे.

कांदालागवड करण्याऐवजी थेट बियाणे पेरणीचा कल वाढला आहे. आतापर्यंत तालुक्‍यात 225 हेक्‍टरवर कांदापेरणी झाली. त्यात आणखी कांदालागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याची शक्‍यता कृषिविभागाने वर्तविली आहे.

पावसाळ्यात टाकलेल्या कांदारोपांची नासाडी झाली. परिणामी, लागवडीसाठी कांदारोपे नसल्याने पुन्हा रोपे टाकून लागवडीसाठी पैसा आणि वेळ लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट कांदापेरणीला पसंती दिली.

पेरणीमुळे खर्चासह वेळ, मशागत कमी लागणार आहे. त्यामुळे कांदापेरणी फायद्याची ठरणार असल्याचे कांदाउत्पादकांनी सांगितले. कांदालागवडीच्या खर्चात बचत होऊन पेरणीमुळे वेळही वाचणार आहे. पेरणी यंत्राद्वारे वाफे पाडणे सोपे झाले आहेत. गोदावरी नदीपट्ट्यासह प्रवरा नदी परिसरातील तालुक्‍यातील शेकडो हेक्‍टरवर कांदापेरणी सुरू आहे. 

थेट कांदा बियाणे पेरणी पध्दतीमध्ये कांदा लागवडीचा एकरी नऊ हजार रुपयांच्या खर्चाची बचत होते. तसेच कांदा उत्पादन कालावधी घटल्याने उत्पादन लवकर होते. २० दिवस ते एक महिना कांद्याचे पिक लवकर काढणीस येते. शेतमजूरी महागल्याने मजूर मिळत नाही. पेरणी यंत्रामुळे लागवडीसाठी लागणारे मजूर शोधण्याचा ताण वाचतो.  

कांदा उत्पादक शेतकरी - सागर ज्ञानेश्वर कदम (गोंडेगाव, ता.श्रीरामपूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

Oracle layoffs : AI मुळे नोकऱ्यांवर गंडांतर? सर्वात मोठ्या IT कंपनीने एका झटक्यात ३०००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने खळबळ

Jalna News: अवकाळी पावसामुळे द्राक्षांना बसला फटका; काढणीला आलेल्या मण्यांना तडे, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

Students Drowning: तीन शालेय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू; घोडेगावातील घटना,नातेवाईकांची घटनास्थळी धाव, मृतदेह बाहेर काढताच फोडला टाहो..

SCROLL FOR NEXT