Ahmednagar  
अहिल्यानगर

Ahmednagar : ट्रॅक्टरच्या अनुदानापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित; कृषी विभागाचा कारभार चव्हाट्यावर!

सकाळ डिजिटल टीम

टाकळी ढोकेश्वर : राज्याचे तत्कालीन कृषी आयुक्त धिरजकुमार हे मागील वर्षी एक दिवस बळीराजासाठी या अभियानातंर्गत किन्ही(ता.पारनेर) येथील बहिरोबावाडी येथे आलेले होते. त्यावेळी अनुदानपर ट्रॅक्टरचे वितरण शेतकरी सचिन मोढवे यांना केले होते. मात्र दहा महिने उलटूनही एक लाख रूपये अनुदान मिळाले नाही.

याबाबत माहीती अशी की, कृषी विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एमआयडीएच या योजनेतंर्गत ट्रॅक्टर व अवजारांसाठी अनुदान दिले गेले.

शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवुन व प्राप्त अर्जांमधुन सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या योजनेतंर्गत किन्ही येथील शेतकरी सचिन पोपट मोढवे यांना २७ एचपी ट्रॅक्टर सोडत पद्धतीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मंजुर झाला होता.

संबंधित शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी देखील केला. त्याचदरम्यान महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषी आयुक्त श्री धिरजकुमार हे एक दिवस बळीराजासाठी या अभियानातंर्गत बहिरोबावाडी (किन्ही) येथे आलेले होते.

त्यावेळी संपूर्ण कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संबंधित शेतकरी सचिन मोढवे यांना ट्रॅक्टरचे वितरण देखील करण्यात आले. परंतु या गोष्टीला दहा महिने होऊन गेले तरी कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये अनुदान अद्याप मिळालेले नाही.

पारनेर तालुक्यातील या एका शेतकऱ्याबरोबर संगमनेर तालुक्यातील पाच व कोपरगांव तालुक्यातील एक असे नगर जिल्ह्यातील सात शेतकरी अनुदानापासून वंचित असुन संबंधित शेतकरी कृषी विभागावर नाराज आहेत.

अनुदान शेतकऱ्यांना वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांचे दहा महिन्यांपासून अनुदान रखडले आहे हि बाब अतिशय गंभीर आहे कृषी विभागाने तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करावे अन्यथा संबंधित शेतकऱ्याचा ट्रॅक्टर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आणुन लावला जाईल

- अनिल देठे, शेतकरी नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT