कांदा छाटणी यंत्र ई सकाळ
अहिल्यानगर

शेतकऱ्याच्या मुलाचे स्टार्टअप, घरीच बनविले कांदा छाटणी यंत्र

संजय आ. काटे

श्रीगोंदे : श्रीगोंद्यातील शेतकऱ्याला कांदा पिकाचा मोठा आधार आहे. मात्र, हा कांदा काढणी, छाटणी यात वेळ आणि पैसा खर्च होतो. वडाळी (ता. श्रीगोंदे) येथील वैभव बाळासाहेब वागसकर हा महाविद्यालयीन तरुण वडिलांचे कष्ट पाहून व्यथित झाला. त्याने थेट कांदा छाटणी यंत्राद्वारे कशी करता येईल, याचा विचार सुरू केला. तसेही तो वेगळे प्रयोग करण्यात तो पटाईत आहे. त्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. कांदा छाटणी यंत्र तयार केले आहे. अवघ्या आठ महिन्यांत हे यंत्र बनविले. (Farmer's son's startup, home-made onion pruning machine)

वैभवला संशोधन करण्याची आवड असल्याने लहानपणापासूनच वेगवेगळे प्रयोग करत आला आहे. तो सध्या शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कला शाखेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. राज्यात कांदा हे पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकासाठी खर्च खूप जास्त होतो. त्यातच बाजारभाव मिळेलच याची शाश्वती नसते.

कांदा लागवड व काढणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागतात. मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडतो. वैभवचे चुलते रामचंद्र वागसकर व वडील बाळासाहेब वागसकर हे नेहमी कांद्याचे पीक घेतात.

एके दिवशी कांदा काढणी सुरु असताना त्याच्या मनात कल्पना आली की कांदा काढणी यंत्र असते तर शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. यावर त्याने संशोधन सुरू केले. तीन वर्ष संशोधन करून प्रत्यक्षात आठ महिने त्यावर राबला आणि यंत्र तयार झाले.

वैभव सांगत होता, मी बनवलेले मशीन कांदा हवी तसा काटणी करते. कांद्याची पात किती अंतरावर कापायची याचा बदल करता येतो. हे मशीन दोन पद्धतीने काम करते, थेट जमिनीतूनही कांदा हार्वेस्टिंगही करता येतो आणि हाताने काढलेला कांद्याची पात वेगळी करता येते.

यंत्रासाठी कसा लागतो कांदा

जमिनीतून कांदा काढणीसाठी लागवडीची पद्धत बदलावी लागेल. त्यासाठी लागवड सरळ रेषेत, मध्ये ठराविक अंतर ठेवून वरिंबे आणि दंड न ठेवता लागवड करावी लागेल. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करू शकतो. परंतु या गोष्टी सर्वच शेतकऱ्यांना सहज शक्य नाहीत तरीही कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त पाच व्यक्तींद्वारे हाताने कांदा देऊन आपला वेळ चार पट वाचविता येईल. एका तासातच हे मशीन ट्रॉलीभर कांदा कट करू शकते. कांदा कट करून पात बाजूला टाकते आणि कांदा ट्रॉलीतदेखील टाकू शकतो.

असे आहे यंत्र

या मशिनची डिझाईन आणि कार्य करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीचे संशोधन त्याने स्वतः केले आहे. या मशीनचे पेटंट देखील लवकरच मिळेल. सुरुवातीला छोटे मॉडेल तयार करून पाहिले. त्यात यश आल्यानंतर मी मोठे मशीन बनवण्याचा निर्धार केला. अडचणी तर क्षणोक्षणी आल्या. यांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही प्रकारच्या अडचणी आल्या. परंतु सगळ्या अडचणींवर मात करून पुढे माझं संशोधनाचे काम चालूच ठेवले.

काय आहे कल्पना

या मशीनमध्ये सगळेच पार्ट फिरणारे आणि हलणारे आहेत. मशीनमध्ये दहा पुल्या, चोवीस गियर आणि 140 बेअरिंग वापरल्या आहेत. मशीन बनवताना खूप वेळा मोडतोड करावी लागल्याने त्याला आर्थिक फटकाही बसला मात्र तो मागे हटला नाही. पेटंटसाठी प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी व अॅड. नीलेश शेलार यांनी मार्गदर्शन केले. वडिलांनी मला आर्थिक तसेच मानसिक पाठबळ दिल्यानेच मी हे यंत्र विकसित करू शकलो. या मशीनचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. लवकरच या मशिनचे निर्मिती सुरू करणार आहोत. यासाठी पयोजा ऍग्री इंनोवेशन्स या या उद्योगाची स्थापना करण्याचे काम चालू आहे. वेबसाईट देखील तयार करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ति किंवा कंपनी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे.

- वैभव वागसकर, यंत्र बनविणारा तरूण.

(Farmer's son's startup, home-made onion pruning machine)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT