farmers strike closed onion auction per quintal price of 1200 ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : नगरमध्ये कांदा लिलाव शेतकऱ्यांनी पाडले बंद; आंदोलनानंतर भाव वाढीचे गौडबंगाल काय?

आंदोलनानंतर पुन्हा लिलाव सुरू झाल्यावर १७०० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे यामागील नेमके गौडबंगाल काय?

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांनी कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.९) नेप्ती कांदा मार्केटमधील कांद्याचे लिलाव बंद पाडले.

यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनानंतर पुन्हा लिलाव सुरू झाल्यावर १७०० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे यामागील नेमके गौडबंगाल काय? असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारने ४ मे रोजी कांदा निर्यातीवरील बंदी हटविल्याचे जाहीर केले. त्यानंतर संपूर्ण राज्यात कांद्याच्या भावात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीला आणण्यास सुरुवात केलेली आहे. सोमवारी झालेल्या लिलावावेळी तब्बल १ लाख ३७ हजार २५८ गोण्या कांद्याची आवक झाली.

१ नंबर कांद्याला २१०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे गुरुवारीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र, लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव सोमवारच्या तुलनेत प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्याचे लक्षात येताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

काही शेतकऱ्यांनी ही बाब बाळासाहेब हराळ यांना फोनवर सांगितली. ही माहिती मिळताच हराळ यांच्यासह भाऊसाहेब काळे, प्रकाश पोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले हे तातडीने नेप्ती मार्केटमध्ये गेले व त्यांनी शेतकऱ्यांसमवेत आंदोलनात सहभागी होत लिलाव बंद पाडले.

हराळ यांनी जिल्हा उपनिबंधकांना फोन करून कांद्याचे भाव अचानक कसे कोसळले याची चौकशी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.दरम्यान, लिलाव बंद आंदोलन सुरू झाल्यावर बाळासाहेब हराळ, भाऊसाहेब काळे, प्रकाश पोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले व काही शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

सत्ताधारी व आडत-व्यापाऱ्यांची मिलीभगत

निवडणुकीच्या काळात सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. मोदी सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. दोन दिवसांपूर्वी २१०० रुपये भाव मिळालेला असताना आज अचानक ८०० ते ९०० रुपयांवर कसा येतो. यात आडते-व्यापारी लॉबिंग करत असून सत्ताधाऱ्यांची आणि आडत - व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब हराळ यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT