Fear of corona due to ajaan in the mosque 
अहिल्यानगर

मशिदीतील अजानमुळे कोरोनाची भीती... शिवसेना-भाजप नेत्यांचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा

नगर ः शहरात मशिदीतून अजान सांगण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. एकीकडे मंदिरांना कुलूप आहे. आणि दुसरीकडे लाउडस्पीकरला बंदी असतानाही मशिदीतून अजान दिला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत आहे

शिवसेना-भाजप नेत्यांनी आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तशा आशयाचे निवेदन पाठविले आहे.

त्यात म्हटले आहे, की जिल्हा प्रशासनाने 28 एप्रिलला मशिदीतून अजान सांगण्यासाठी परवानगी दिल्याचे कळले. लॉकडाउनमध्ये हिंदू, ख्रिश्चनांसह अनेक धर्मीयांचे सण आले होते. सर्वांनी संयम पाळून ते घरातच साजरे केले. 

सर्वोच्च न्यायालयानेही धार्मिक सण-उत्सवावर निर्बंध घातले आहेत. असे असताना मशिदीतून अजान करण्यास परवानगी दिल्याने या निर्णयामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो.

अनेक मशिदीतून शनिवारी अजान देण्यात आले. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. या बाबत गंभीर दखल घ्यावी, अशी विनंती निवेदनात केली आहे.

या निवेदनावर शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे नेते अभय आगरकर, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांच्या सह्या आहेत. 

आतापर्यंत हिंदू धर्मीयांनी संयम पाळला. सरकारच्या आणि न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांचे पालन केले. परंतु एका धर्माला झुकते माप दिले जाते, हे योग्य नाही. कायद्यापुढे सर्वच सारखे आहेत. मग अजानसाठी वेगळा न्याय का. अगोदरच तबलिगीमुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता, ही वस्तुस्थिती आहे.

-अनिल राठोड, माजी आमदार , शिवसेना,नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT