Fight for a lift on the radish dam, Anna advises 
अहिल्यानगर

मुळा धरणावरील लिफ्टसाठी लढा उभारा, अण्णांचा शेतकऱ्यांना कानमंत्र

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : ""आपल्या हक्‍कासाठी लढा उभारा, संघर्ष करा. पाण्यावर सर्वांचा समान अधिकार असतो. पाणी मिळाल्यास लाखो एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. त्याचा फायदा पुढील सर्व पिढ्यांना होईल. आंदोलन करून सरकारला जागे करा. मी या संघर्षात तुमच्या पाठीशी आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

सात गाव पाणी लिफ्ट योजना संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेत, मुळा धरण येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारून लिफ्टद्वारे पाणी डोंगरगणजवळील सीना नदीच्या उगमस्थानी सोडण्याबाबत चर्चा केली. त्या वेळी हजारे बोलत होते. सात गाव पाणीयोजना संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय पटारे, उपाध्यक्ष बबनराव पटारे, डोंगरगणच्या सरपंच वैशाली मते, उपसरपंच संतोष पटारे, मांजरसुंबेचे उपसरपंच जालिंदर कदम, शेंडीचे सरपंच बापूसाहेब दाणी, सदस्य सर्जेराव मते, पाराजी लांडे, अर्जुन भुतकर, दानियल शिरसाठ आदी उपस्थित होते.

पटारे म्हणाले, ""मुळा धरणातून झालेल्या वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्‍यापर्यंत पोचले; मात्र चारीपासून अवघ्या आठ-दहा किलोमीटरवरील गावे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळ्यात या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते. ही सात गावे मुळा धरणापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरात आहेत आणि वांबोरी चारीपासून अवघ्या 5-6 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे या गावांतील शेतीला पाणी मिळणे गरजेचे आहे. पाणी मिळाल्यास या शिवारातील हजारो एकर शेतजमीन ओलिताखाली येईल. त्यामुळे या लिफ्ट योजनेचे सर्वेक्षण करून एस्टिमेट तयार करणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांच्या कानावर हा प्रश्‍न घालून विषय मार्गी लावावा, अशी विनंती हजारे यांना केली.'' 

डोंगरगण येथील नदीच्या उगमस्थानी पाणी सोडल्यास त्यातून नदीवरील सर्व बंधारे भरतील. त्यानंतर पाणी मांजरसुंबे शिवारातून आढाववाडीत येईल. तेथून नदीद्वारे ते पिंपळगाव माळवी तलावात जाईल. तशी व्यवस्था आहे. तलावातील पाणी पिंपळगावसह धनगरवाडी, जेऊर, शेंडी परिसरालाही देता येईल. शिवाय, वडगाव गुप्तापर्यंत हे पाणी सहज आणता येईल. 
- संजय पटारे, अध्यक्ष, सात गाव पाणी संघर्ष समिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT