नांदेड क्राईम न्यूज 
अहिल्यानगर

व्याजाच्या पैशासाठी ट्रॅक्टर ओढून नेला, सावकाराला अटक

नीलेश दिवटे

कर्जत : व्याजाच्या पैशासाठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढून नेणाऱ्या सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघा पैकी महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके (वय -३०, रा. नेटकेवाडी, ता. कर्जत) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

तालुक्यातील दळवी वस्ती येथील एकाने फिर्याद दिली की, १७ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके व इतर दोघांनी मला व माझ्या भावाच्या घरात घुसून माझ्या नातेवाईक यांना घरात घेत व्याजाने घेतलेले पाच लाख पन्नास हजार व त्यावरील व्याजासह एकूण दहा लाख रुपये द्या, असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली. (Filed a case against the lender in Karjat)

तसेच फिर्यादीचा फार्मट्रॅक कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच १६ एफ ६७६६) हा बळजबरीने ओढून नेला. तो नेताना आमचे १० लाख रुपये द्या, तेव्हाच ट्रॅक्टर घेवून जा. जर तुम्हाला पैसे द्यायचे नसले तर तुमची जमीन माझे नावावर करुन दे, नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके यास अटक करुन त्यच्याकडून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

कोणीही अवैध सावकारकी करु नये. कोणत्याही ग्रामस्थांना सावकाराकडून वसुलीसाठी काही त्रास होत असेल तर तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत

(Filed a case against the lender in Karjat)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT