drunken esakal
अहिल्यानगर

दारूची नशा पडली महागात; अखेर खाल्ली जेलची हवा..!

विलास कुलकर्णी

राहुरी (जि.अहमदनगर) : दोन महाभाग फुल्ल टल्ली झाले. नशेत पोलीस ठाण्यात शिरले. ठाणे अंमलदारांच्या दालनात मोक्कार आरडाओरड करुन, अवघे पोलीस ठाणे डोक्यावर घेतले. पण त्यांची नशा खाडकन उतरली. गयावया सुरु झाल्या. पण उशीर झाला होता. कारण दारुच्या नशेने केव्हाच घात केला होता.....

नाहीतर विषारी औषध पिऊ....

तुकाराम रामकृष्ण राजदेव (वय ३५), संदीप नामदेव राजदेव (वय ३०, दोघेही रा. ब्राम्हणी) अशी अटक केलेल्या दारुड्यांची नावे आहेत. दोघेही चुलत भाऊ. दोघांनी भरपूर दारु ढोसली. नशेचा अंमल चढला. तशी त्यांच्या अंगात वीरश्री चढली. स्वतःच्या पायावर नीट उभे राहता येईना. तरी, त्यांनी धीटाईने राहुरी पोलीस ठाणे गाठले. बुधवारी (ता.११) रात्री सव्वा सात वाजता दोघांनी ठाणे अमलदारांसमोर आमची तक्रार घ्या. असा आग्रह धरला. तक्रार काय आहे. असे विचारल्यावर त्यांनी "आम्ही दारू पिऊन पडलो. आमची तक्रार नोंदवा." असा घोशा लावला. "कुणा विरुद्ध तक्रार द्यायची." असे ठाणे अंमलदारांनी विचारल्यावर "ते आम्हाला माहिती नाही. तुमची तक्रार नोंदवा. नाहीतर विषारी औषध पिऊ." अशी दमबाजी सुरू केली. पोलीस विनवण्या करून, त्यांना निघून जाण्यास सांगू लागले. तसा त्यांचा पारा चढला. आवाज वाढला. आरडाओरड करुन, त्यांनी पोलिस ठाणे डोक्यावर घेतले.

एवढ्यात, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरडाओरड ऐकून दोघांना केबिनमध्ये बोलविले. त्यांचा अवतार पाहून समजायचे ते समजले. दोघांची उचलबांगडी करून, वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला आल्यावर त्यांची नशा उतरली. त्यांनी पोलिसांना गयावया केली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांचा दाखला घेऊन, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अखेर दोघांना दारूच्या नशेमुळे जेलची हवा खावी लागली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

IND vs SL: शुभमन गिल सचिन, सेहवागच्या रांगेत बसला! कपिल देव यांचा रेकॉर्ड अवघ्या ७ दिवसांनी मोडला

12व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या सायरा बानो, 22 वर्षांचं अंतर असूनही केलं लग्न, 55 वर्षं जपलं नातं

Marathi News Live Updates : कावेरीचे पाणी सोडल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची कर्नाटक सरकारवर जोरदार टीका

Raksha Bandhan 2026: भद्राकाळ म्हणजे काय? या काळात राखी का बांधू नये? जाणून घ्या पौराणिक कथा!

SCROLL FOR NEXT