final voter list will be released in January Chief Electoral Officers shrikant deshpande EVM CCTV ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : जानेवारीत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती; ईव्हीएमवर सीसीटीव्हीची निगराणी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल. राज्यातील ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ईव्हीएम मशिनची तपासणी झाली आहे. सर्व मशिन २४ तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली स्ट्राँग रूममध्ये आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार साक्षरता मंडळाची कार्यशाळा शुक्रवारी (ता. १५) पार पडली. कार्यशाळेनंतर देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्यात सध्या मतदार जागृती मोहीम सुरू आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेतर्फे जिल्ह्यातील ३८ महाविद्यालयांचे नोडल अधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी मतदार साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली. निवडणूक विभाग राज्यात घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहे.

सिद्धाराम सालीमठ म्हणाले, की बीएलओंना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा आहेत. नवीन मतदार नोंदणी करणे, मृत व विस्थापितांची नाव वगळणे, अशी प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात नवीन दाखल झालेल्या मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.

या तपासणीत नादुरुस्त यंत्रे पुन्हा कंपनीकडे पाठविली आहेत. सध्या मतदानासाठी सुस्थितीत असलेली ९ हजार ८९० बॅलेट, ५ हजार ५६७ सेंट्रल युनिट व ६ हजार १७ व्हीव्ही पॅट मशिन उपलब्ध आहेत. जिल्ह्यासाठी सुमारे साडेतीन हजार मतदान यंत्रांची आवश्यकता असते.

२६ हजार ३२० नवमतदारांची नोंदणी

जिल्ह्यात २८ हजार २१४ मतदार मृत आढळले. ११ हजार ३६ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले. ही नावे मतदार यादीतून वगळली जातील, तसेच १५ हजार ३३ मतदारांनी दुरुस्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. २६ हजार ३२० नवमतदारांची मतदार यादीत नावनोंदणी केली आहे.

ही मोहीम २ ऑगस्ट रोजी एकाच वेळी जिल्ह्यातील १०७ महाविद्यालयांमध्ये राबवली. त्यातून ४ हजार २६ युवा मतदारांची नोंदणी केली आहे. त्याशिवाय १२ व १३ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागात २ हजार ३९१ वाड्या-वस्त्या-तांडे व पाडे या ठिकाणी मतदार नोंदणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT