sangram jagptap
sangram jagptap sakal
अहमदनगर

भुईकोट किल्ल्यासाठी पुन्हा पाच कोटी; आमदार संग्राम जगताप

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या(ahmednagar fort) सुशोभीकरण कामासाठी सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप(mla sangram jagtap) यांनी दिली.जगताप म्हणाले, की शहराला सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. या सुशोभीकरणाच्या माध्यमातून नगर शहराच्या पर्यटनवाढीला मदत होणार आहे. भुईकोट किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आपले प्रथम कर्तव्य ठरते. यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ९० लाखांचा पहिला हप्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाला आहे.

या निधीच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याची संरक्षक भिंत, किल्ला परिसराची स्वच्छता, पार्किंग शेड, अंतर्गत प्रसाधनगृहे, पाथ-वे दुरुस्ती व पुरातन काळातील खापरी पाइपलाइनची दुरुस्ती, तसेच लॉन सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांची कामे, किल्ला परिसरातील इमारतींची दुरुस्ती, विद्युतीकरण आदी कामासाठी पर्यटनमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे, सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, असे आमदार जगताप म्हणाले.

स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात द्या

भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक करून स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात द्या, ही नगरकरांची जुनी मागणी आहे. त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे नगरकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, निधी मंजूर झाल्याने काही प्रमाणात समाधान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT