Five hundred and fifty corona patients again in Ahmednagar today 
अहिल्यानगर

नगरमध्ये आज पुन्हा साडेपाचशे कोरोना रूग्ण

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यात जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले.  

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१६५  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३  इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६२.०५ टक्के इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  कोपरगाव ०१, मनपा ०५, नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०६, शेवगाव ०१, राहुरी ०१ , कर्जत ०१, नेवासा ०१, पारनेर ०२, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३२१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ५०, संगमनेर ३४,  राहाता १०, पाथर्डी ३१, नगर ग्रामीण ११, श्रीरामपुर १०,  कॅन्टोन्मेंट १८,  नेवासा १९, श्रीगोंदा २३, पारनेर १२, अकोले ०५, राहुरी ०४,  शेवगाव २४,  कोपरगाव ३२, जामखेड ०९ आणि कर्जत २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६५, संगमनेर ११, राहाता ०२, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ०७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट ०१,  नेवासा ०५, श्रीगोंदा ०३, पारनेर ०२, अकोले ०६, राहुरी ०१, कोपरगांव ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ०७, पाथर्डी १९, नगर ग्रा.१३,  श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी ०१,  शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १५

बरे झालेले एकूण रुग्ण:५३३३

उपचार सुरू असलेले रूग्ण:३१६५

मृत्यू: ९६, एकूण रूग्ण संख्या: ८५९४

- संपादन ः अशोक निंबाळकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT