Five hundred and fifty corona patients in Ahmednagar today 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाचे आज पावणेपाचशे रूग्ण

दौलत झावरे

नगर ः जिल्ह्यात गेले दोन दिवस 500च्या पुढे कोरोनाबाधित सापडत होते. आज 483 पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधिताची संख्या 10 हजाराच्या उंबरठ्यावर गेली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा 9723 झाला अाहे. त्यातील 6250 रुग्ण घरी परतले आहेत. सध्या 3367 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयाच्या अहवालात दुपारी 41 पॉझिटिव्ह आले. त्यात महापालिका हद्दीत 23, संगमनेर एक, राहाता एक, नगर ग्रामीण 10, कॅन्टोन्मेंट एक, नेवासे दोन, शेवगाव एक व कोपरगावातील दोघांचा समावेश होता.

सायंकाळच्या अहवालात अँटीजेन चाचणीत 257 बाधीत आढळले. त्यात संगमनेर 33, राहाता 22, पाथर्डी 48, नगर ग्रामीण 13, श्रीरामपूर सहा, कॅन्टोन्मेंट 21, नेवासे 21, श्रीगोंदे 21, पारनेर 11, अकोले चार, राहुरी 10, शेवगाव 9, कोपरगाव चार, जामखेड 10 व कर्जतमधील 24 रुग्णांचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 185 बाधीत आढळले. त्यात महापालिका हद्दीत 147, संगमनेर 9, पाथर्डी एक, नगर ग्रामीण आठ, श्रीरामपूर तीन, कॅन्टोन्मेंट चार, नेवासे एक, श्रीगोंदे एक, पारनेर दोन, अकोले दोन, राहुरी पाच, शेवगाव व कोपरगावला प्रत्येकी एक रुग्ण आढळला. 

आणखी 384 कोरोनामुक्त 
जिल्ह्यात आज 384 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 67.34 आहे. त्यात महापालिका हद्दीत 172, संगमनेर 23, राहाता तीन, पाथर्डी 27, नगर ग्रामीण 16, श्रीरामपूर 18, कॅन्टोन्मेंट 13, नेवासे 21, श्रीगोंदे 18, पारनेर 10, अकोले चार, शेवगाव 14, कोपरगाव 39, जामखेड पाच, लष्करी रुग्णालयातील एकाचा समावेश आहे. 

मृत्यूचा आकडा वाढतोय 
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे. मागील गुरुवारपासून आजपर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला. त्यात गुरुवारपासून जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा वाढत आहे. गुरुवारपर्यंत (ता. सहा) 94 मृत्यू झाले होते. त्यात शुक्रवारी 2, शनिवारी 4 व आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT