Five hundred and fifty corona patients in Nagar district 
अहिल्यानगर

नगरचा कोरोना बाधितांचा आकडा काही खाली येईना, आजही पुन्हा तेच

सकाळ वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४७२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५७, अँटीजेन चाचणीत २५७ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४१,  संगमनेर ०१, राहाता ०१,  पाथर्डी ११, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०६, श्रीगोंदा ०३, पारनेर ०३, अकोले  १७, शेवगाव ५१, कोपरगाव ०१, जामखेड ०२, कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६८, राहाता १४ , नगर ग्रामीण २४,  श्रीगोंदा १८, पारनेर १७, अकोले ०५, राहुरी १५, शेवगाव २३, कोपरगाव ३५, जामखेड १७ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३२, संगमनेर २०, राहाता ०५, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपुर १८, नेवासा ०३, श्रीगोंदा ०१,  पारनेर ०२, अकोले ०४, राहुरी ०१, शेवगाव ०१,  कोपरगांव ०३, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६३८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०५ संगमनेर ४२ राहाता ३२, पाथर्डी १२, नगर ग्रा.४२, श्रीरामपूर ४३, कॅंटोन्मेंट १०,  नेवासा ५३, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १३, राहुरी २१, शेवगाव ३८,  कोपरगाव ५३, जामखेड ०८, कर्जत १५, मिलिटरी हॉस्पिटल १८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २१७१०, उपचार सुरू असलेले रूग्ण:३४७२, मृत्यू: ३७१

एकूण रूग्ण संख्या:२५६१३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

Viral Video: डीजेचा दणदणाट नव्हता, लेझीम-टिपरीचा जल्लोष होता; पाहा १९९१ मधील पुण्याची पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

SCROLL FOR NEXT