corona news in nagar 
अहिल्यानगर

माळीवाडा बनला कोरोनाबाधितांचे माहेरघर, कुटुंबातील पाच बाधित

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना महामारीने चोहोबाजूने फेर धरला आहे. दररोज किमान दहा ते पंधराजण रूग्ण सापडत आहेत. कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेला नगर पुन्हा धोक्याची पातळी अोलांडतो आहे. सकाळी सहा अहवाल आले होते. तर संध्याकाळी तब्बल १२जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. जिल्ह्यात कोरोनाधितांची संख्या १९५ झाली आहे. दोनशेचा आकडा गाठण्यासाठी केवळ पाचच कमी आहेत. एकंदरीत बाधितांचा वेग पाहता, तोही रातोरात गाठला जाऊ शकतो, अशी आरोग्य यंत्रणेला भीती आहे.

अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव्ह आढळून आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते, तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील ९० रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्हयातील अॅक्टीव केसेस ९५ (०२ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात), राहाता येथील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा आहे. काल बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे कुटुंब कोरोना बाधित आहेत. यात ०४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय, मार्केट यार्ड येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधित आहे. लालानगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण आहे. यापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाचे वडीलांचा त्यात समावेश आहे.  

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. बाधिताची पत्नीचाही अहवाल काल आला होता. तसेच, भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण आहे.

कळंबोली सेक्टर -०४ (मुंबई) येथून पाथर्डी येथे आलेला ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण निघाली. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९५ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT