Five more patients were found 
अहिल्यानगर

कोरोना पाठ सोडेना... आणखी पाच रुग्ण वाढले 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार कोरोनाबाधित पाच रुग्णांची भर पडली. आता रुग्णसंख्या 266 वर जाऊन पोचली आहे. तर, आतापर्यंत 119 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यात गेल्या काही तासांत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. काल सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आज सकाळी पुन्हा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्‍यातील निमोण येथील एकाच कुटुंबातील तिघेजण आहेत. ते यापूर्वी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले होते. एक रुग्ण अकोले तालुक्‍यातील समरेशपूर येथील आहेत तर, संगमनेर तालुक्‍यातील गुंजाळवाडी येथील एकजण आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 266 झाली आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात संगमनेर सहा, निमोण दोन, निघोज, कोपरगाव, जामखेड, श्रीरामपूर, नगर, राशीन, निंबळक प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. नुकतीच 85 व 70 वर्षांच्या आजीबाईसह 13 महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर मात मिळवली. योग्य काळजी घेतल्यास आपणही कोरोनावर मात मिळवू शकतो. हे त्यांनी इतरांना दाखवून दिले. 

नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ठेवून प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या लढ्यात नागरिकांचा सहयोगही महत्त्वाचा असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

SCROLL FOR NEXT