Leopards Attack esakal
अहिल्यानगर

श्रीरामपूरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात दोन मुलांसह सात जण जखमी

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरातील मोरगे वस्ती परिसरात आज (रविवारी) सकाळच्या सुमारास घुसलेल्या नर जातीच्या बिबट्याने धुमाकूळ घालुन दोन मुले आणि इतर पाच जणांवर हल्ला चढवुन गंभीर जखमी केले. त्यामुळे शहर परिसरात सर्वत्र भितीचे वातावरण पसरल्याने गोंधळ उडाला होता. बिबट्याला बघण्यासाठी मोरगे वस्ती परिसरात शेकडो नागरीकांनी गर्दी केली होती. परिणामी, बिबट्या सैरभैर होवून त्याने एका पाठोपाठ तब्बल सात जणांनावर हल्ले करुन जखमी केले.

श्रद्धा सचिन हिंगे (वय ११), ऋषभ आंबादास निकाळजे (वय ८), कांताशेठ कुमावत (वय ३५), बाळासाहेब आडांगळे (वय ५५), राहुल मारुती छल्लारे (वय ४२), मारुती शिंदे (वय ५०) यांच्यासह वन कर्मचारी लक्ष्मण किमकर (वय ५०) हे बिबट्याच्या हल्यात जखमी झाले. असून शहरातील कामगार रुग्णालयासह व बधे हाॅस्पिटमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील सिव्हिल रुगालयात हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

शहरातील मोरगे वस्ती भागातील रहिवासी गुलाब झांजरी यांच्या घराच्या परिसरात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आढळलेल्या चार वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याने खासगी क्लासेसला जाणाऱ्या हिंगे हिच्यावर अचानक हल्ला केला. त्यात तिच्या हातावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर बिबट्याने ऋषभ याच्यावर झडप घालुन पाठीवर व पोटावर पंजा मारुन जखमी केले. शहरातील लोकवस्तीत भरदिवसा घुसलेला बिबट्याला पहाण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. परिणामी, सकाळी दहा वाजेपासुन ते दुपार एक वाजेपर्यंत सैरभैर झालेल्या बिबट्याने वन कर्मचारी किमकर यांच्यासह आणखी सहा नागरीकांवर हल्ले केले. बिबट्याला पळवुन लावण्यासाठी काही नागरीकांनी फटाके फोडून आरडाओरडा केल्याने बिबट्या सैरभैर होवून अधिक हिस्र बनला.

दुपारच्या सुमारास झावरे मोटर्स पाठीमागील झुडूपात लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग, पालिका प्रशासन, महसुल विभाग व पोलिस पथकाने धाव घेतली. बिबट्याला पकडण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरु होते. अखेर मोहटा देवी मंदीर परिसरात एका काॅलनीत वनविभागाने बिबट्याला पकडले. वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला इंजेक्शन देवून बेशुद्ध करुन काही वेळाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

लोकवस्तीत घुसलेला बिबट्या घाबलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तो दिसेल त्यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवित होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरातील वैदू समाजातील काही लोकांची मदत घेण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्यांसह सहा नागरीक जखमी झाले. असून जखमींचा उपचारासाठी लागणारा खर्च सरकार करणार आहे. तसेच बेशुद्ध केलेल्या बिबट्यावर उपचार केल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी सुवर्णा झोळ-माने यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT