Flag hoisting by Vaishnavi Santosh Lahamge a girl who passed 10th in Rajur 
अहिल्यानगर

म्हणून नात आणि ७४ वर्षाच्या आजोबांच्या हस्ते केले ध्वजारोहण

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : वैष्णवी संतोष लहामगे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, घरकाम करून श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीची परीक्षा होऊन ८७ टक्के मार्क मिळवले. ती विद्यालयात प्रथम आली आहे.

वैष्णवीच्या या गुणवत्तेचे कौतुक राजूर ग्रामस्थांनी केले. यामुळे त्यांनी आज चक्क तिच्या व आजोबांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे ध्वजारोहण केले. ७४ व्या स्वातंत्र्य दिनी तिचे ७४ वर्ष आजोबा व वैष्णवी दोघांनी झेंड्याची दोरी ओढली नी फुलाचा वर्षाव होत ते दोघांचे शिक्षकांनी स्वागत केले.

वैष्णवीला आपल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटले. मात्र तिला डोळ्यातील आनंदाश्रु आवरता आले नाही. मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी त्या दोघांचे स्वागत केले. प्रसंगी बोलताना आजोबा रामनाथ माधव लहामगे म्हणाले माझ्या व नातीच्या हस्ते ध्वजवदन झाले. हे आमच्या सारख्या गरीब माणसांसाठी फार मोठी गोष्ट आहे. वयाची ७४ वीमध्ये मला व नातीला एकाच वेळी हा सन्मान मिळणे म्हणजे आमच्या आयुष्यातील दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.

या शाळेला व शिक्षकांना विसरू शकणार नाही. तर वैष्णवी म्हणाली मला अचानक माझ्या मुख्याध्यापिकेचा फोन आला. उद्या शाळेत आजोबांना घेऊन ये तुमच्या हस्ते शाळेचे ध्वजवदन करायचे आहे. मी इतकी छोटी ना आमदार ना अधिकारी माझ्या हस्ते कसे काय? मला प्रथम नंबरपेक्षा हा मन व सन्मान मिळाला. हा माझ्या पुढील आयुष्यात कायम स्मरणात राहील.

मी माझ्या शाळेला व शिक्षकांना कधीच विसरणार नाही. देशाची एक नागरिक म्हणून देशासाठी, शाळेसाठी माझ्या गावसाठी मी काही तरी करून दाखवीन, असा विश्वास तिने व्यक्त केला. सामाजिक अंतर राखत मास्क लावून हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

SCROLL FOR NEXT