Flowering trays on national highways
Flowering trays on national highways 
अहमदनगर

पुणे-नाशिक महामार्गावरील फुलांचे ताटवे प्रवाशांना सुखावतात

आनंद गायकवाड

संगमनेर ः संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर लावलेल्या फुलझाडांच्या रंगीबेरंगी ताटव्यांमुळे निर्माण झालेल्या निसर्गसौंदर्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवाशी सुखावत आहेत.

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या चौपदरी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग खेड सिन्नर एक्स्प्रेस वे लिमीटेड या कंपनीने 3 वर्षांपूर्वी बांधा वापर हस्तांतरित करा या तत्वावर निर्मीती करुन तो वाहतुकीसाठी खुला केला.

या प्रमुख मार्गावर दोन स्वतंत्र लेन असल्याने, वाहन चालकांच्या सोयीसाठी दुभाजकांची रचना केलेली आहे. या दुभाजकावर ठेकेदार कंपनीने लाईट कटर म्हणून लावलेली शोभेची व फुलझाडे चांगलीच बहरली आहेत. पावसाळा संपून हिवाळा सुरु झाल्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी हा पर्यटक तसेच भटक्यांसाठी आदर्श काळ असतो.

मुळातच पुणे, नाशिक मुंबई या औदयोगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या महानगरांना जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची घनता आहे. तालुक्यातील चंदनापुरी व एकल व कऱ्हे घाटातून जाणाऱ्या य़ा मार्गावरील अनेक सौंदर्यस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. 

या मार्गावर दोन्ही मार्गिकेवरुन रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनांच्या तीव्र प्रकाश झोताचा त्रास समोरच्या वाहनचालकांना होवू नये यासाठी लाईट कटर म्हणून प्लॅस्टीकच्या कृत्रीम साधनांऐवजी विविध प्रकारची शोभेची व फुलझाडे लावली आहेत. त्यात लाल, गुलाबी, सफेद रंगाची बोगनवेल, पिवळ्याधमक फुलांची टिकोमा, विविधरंगी कन्हेर, टिव्हीसिया अशा वर्षभर फुलणाऱ्या वनस्पतींचा वापर केला आहे.

ही झाडे चांगली वाढल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा शिणवटा या रंगिबेरंगी फुलांच्या दर्शनाने दूर होतो. याची नियमित देखभाल होत असून सध्या वाळलेले गवत व अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अमित राणा यांनी सकाळशी बोलताना दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT