A flurry of statistics in front of the revenue minister 
अहिल्यानगर

महसूल मंत्र्यांच्या समोरच केला आकडेवारीचा घोळ

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. या उपाययोजना व परिस्थितीचा आढावा काल महसूलमंत्र्यांनी घेतला. यामध्ये तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे संतप्त झालेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 

महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्‍यातील आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये या बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे प्रांताधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते. 

बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाने तालुक्‍यात सध्या 692 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे, तर तालुका आरोग्य विभागाने केवळ 458 रुग्ण असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येतील तफावत पाहून आकडेवाडीत एवढा फरक कसा काय, चुकीची माहिती का देतात? शहर परिसरात 392 कोरोनाबाधित रुग्ण असून, इतर 200 रुग्ण कुठे आहेत, असा सवाल थोरात यांनी विचारला. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे निरत्तर झाल्याने महसूलमंत्र्यांनी त्यांच्या बरोबर पालिकेचे डॉ. संकेत मुंदडा यांची कानउघाडणी यावेळी करण्यात आली. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, मागील बैठकीत तुम्हाला विशेष सूचना दिल्या होत्या. परंतु तुम्ही कोरोनाबाबत अद्याप गंभीर झालेले दिसत नाही. त्यामुळे वाढता संसर्ग कसा रोखता येणार, बैठकीपूर्वी समन्वय साधून चर्चा करुन पुरेशी माहिती संकलन करणे आवश्‍यक आहे. बैठकीपूर्वी तुम्ही रुग्णांच्या आकडेवारीची तपासणी का केली नाही असा जाब विचारला. 

राज्याच्या निधीतून तालुक्‍यासाठी आणखी 25 खाटांची कोविड उपचार सुविधेसाठी सहकार्याची अपेक्षा आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केली. नागरिकांना तपासणी अहवाल 24 तासांमध्ये मिळाला पाहिजे. चांगल्या सुविधा उभ्या करुन गरजू रुग्णांना सुविधा द्या. रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्यासह जेवणाची व्यवस्था करावी, खासदार सदाशिव लोंखडे यांनी दिल्या. 
 
अधिकाऱ्याला टी शर्ट भोवला
नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आढावा बैठकीला टी शर्ट घालून आले होते. या बैठकीत माहिती सादर करण्यासाठी ते उठले असता ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची झाडाझडती घेतली. मंत्र्यांच्या दौऱ्यात अशा प्रकारे येता येते का? असा सवाल करीत बैठकीतून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यानंतर ते बाहेर गेले. 
 

कोरोना संसर्ग पसरविणारे ठिकाणे तात्काळ बंद करा. भाजीपाला विक्रेते मास्क लावत नसेल तर कडक कारवाई करा. अत्यावश्‍यक सेवा पुरवतांना नियमांचे उल्लघंन केल्यास दुकाने बंद करा. 
- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: काटोलमध्ये शरद पवार पक्षाच्या अर्चना देशमुखांची विजयी आघाडी

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT