Follow law and order for Gram Panchayat elections 
अहिल्यानगर

कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल, सहायक पोलिस अधीक्षकांचा इशारा

सुनील गर्जे

कुकाणे : आदर्श आचार संहितेचे पालन करून ग्रामपंचायत निवडणुका लोकशाही पद्धतीने शांततेत पारपाडा, अन्यथा कायदा हातात घेणारांची गय  केली जाणार नाही असा इशारा नेवासे पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी केले. एकंदर त्यांनी कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल असाच इशारा दिला.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यागी यांनी कुकाणे (ता.नेवासे) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची समन्वय बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच दौलत देशमुख, अमोल अभंग, एकनाथ कावरे,  कारभारी गोर्डे, मुसा इनामदार, जवाहर भंडारी, अनिल गर्जे,  भारत गरड प्रमुख उपस्थितीत होते. 

अभिनव त्यागी म्हणाले, " समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी  सर्वांचीच आहे. यासाठी सर्वांनी प्रशासनास मदत करावी,  पोलीस प्रशासनाचे सर्वांना सहकार्ये आपल्याला  राहील. यावेळी अमोल अभंग, अनिल गर्जे आदीनी मनोगत व्यक्त करत होणारी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पारपाडण्याची ग्वाही  दिली. 

यावेळी त्यागी यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थानतीच्या वतीने  प्रशासक सुशील माळवदे, ग्रामविकास अधिकारी सुभाष गर्जे यांनी सत्कार केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT