food serve in silver plate for sai devotees at Hotel abigail regency shirdi Sakal
अहिल्यानगर

Sai Baba's Devotee : ‘ॲबीगेल रिजन्सी’ या हाॅटेल मध्ये साईभक्तांना चांदीच्या ताटात शाही भोजन

Social Worker Deepak Kadam : सामाजिक कार्यकर्ते दीपक निकम यांचा उपक्रम

सतीश वैजापूरकर

Shirdi News : कोविड प्रकोपात साईसंस्थानच्या रूग्णालयातील डाॅक्टर व कर्मचा-यांसाठी दिल्ली येथील साईभक्तांकडून युध्दपातळीवर खास विमानाने देणगी स्वरूपात पीपीई कीट उपलब्ध करून देण्यासाठी येथील साईभक्त सामाजिक कार्यकर्ते दीपक निकम यांनी पुढाकार घेतला. आता ते चालवित असलेल्या ‘ॲबीगेल रिजन्सी’ या हाॅटेलात त्यांनी साईभक्तांना चांदीच्या ताटात भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला.

चांदीचे ताट, चांदीच्या सात वाट्या आणि चांदीचाच ग्लास असा थाट असलेल्या या शाही भोजनासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात आलेले नाही. भाविकांची शिर्डी भेट संस्मरणीय व्हावी, याहेतूने साईभक्तीच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

कोविड प्रकोपात साईसंस्थानने सुरू केलेल्या रूग्णालयात राज्यभरातून रूग्णांचा ओघ सुरू झाला. पीपीई कीट आणि अन्य वैद्यकीय साहित्य मिळवीणे मुश्कील झाले. अशा कठीण काळात निकम व त्यांचे सहकारी सतीश गंगवाल यांनी दिल्लीतील साईभक्तांसोबत संपर्क साधला.

अवघ्या दोन दिवसात त्यांनी हे साहित्य खास विमानाने शिर्डीला धाडले. केवळ साईसंस्थानच्या रूग्णालयाचीच नव्हे तर तालुक्यातील सरकारी कोविड रूग्णालयाची गरज देखील या साहित्यामुळे पूर्ण झाली.

येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात एकशे चाळीसहून अधिक वृध्द वास्तव्यास आहेत. या आश्रमास वाढीव इमारतीची गरज होती. निकम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. दाते शोधून नवी इमारत उभी करून दिली. साईभक्तीच्या प्रेरणेतून त्यांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात ते सदैव आघाडीवर असतात.

शिर्डीत येणा-या भाविकांना सेवा सुविधा आणि सन्मान देणे ही काळाची गरज आहे. साईभक्त सामाजिक कार्यकर्ते दीपक निकम यांनी चांदीच्या ताटात भाविकांसाठी भोजन हा उपक्रम सुरू केला हा त्याचाच एक भाग आहे. येथे आलेल्या भाविकांना आपुलकीचा अनुभव यायला हवा. धार्मिक पर्यटन विस्तारासाठी ते आवश्यक आहे.

-सतीश गंगवाल, अध्यक्ष, जैन कांच मंदिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात निवडायला हवं! दिग्गज खेळाडूची मागणी; म्हणाले, तो मॅच्युअर नाही असं...

Pune News : पुणे शहराला विषाणूजन्य आजारांचा विळखा; ‘एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ

Deglur Rain : देगलूरात ढगफुटीसदृश्य पाण्याने हाहाकार; अनेक गावे जलमय शेती ही पाण्याखाली, २५ गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Live Updates : सांताक्रूझमधील अकोला पोलीस स्टेशन परिसरात साचलं पाणी

CP Radhakrishnan Meet PM Modi: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT