for maratha reservation protest shirdi closed maratha community marathi news Sakal
अहिल्यानगर

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शिर्डीत कडकडीत बंद

उपोषण, पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज शिर्डी, राहाता, लोणी खुर्द, लोणी बुद्रुक व परिसरातील गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. राहाता व शिर्डीत एसटी बसेस आणि भिंतीवरील पोस्टरवर असलेल्या नेत्यांच्या फोटोंना काळे फासण्यात आले.

मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सरोदे यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली. कोंबड्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे फोटो अडकवून निषेध करण्यात आला. शिर्डीचे माजी नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी आपल्या सहकाऱ्यासह पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

शिर्डी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे आज बेमुदत उपोषणात रूपांतर करण्यात आले. सचिन चौगुले, रवि गोंदकर, कानिफ गुंजाळ व नितीन अशोक कोते, प्रकाश गोंदकर व प्रशांत रहाणे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

साईमंदिर, साईसंस्थानच्या धर्मशाळा व प्रसादालय वगळता शिर्डीतील सर्व दुकाने व हाॅटेल आज बंद होती. आजपासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणास कमलाकर कोते, रमेश गोंदकर, हरिश्चंद्र कोते, ताराचंद कोते, यश कोते, विकास कोते, तानाजी कोते, दत्ता कोते आदिंनी उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दिला.

नेत्यांच्या फोटोंना काळे फासले

राहाता येथे आज सकाळी मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र जमले. पोस्टरवरील व बसवरील नेत्यांच्या फोटोंना काळे फासण्यात आले. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

राहाता शहरात वीरभद्र मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले. माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, मुन्ना सदाफळ, सागर सदाफळ, तुषार सदाफळ, कानिफ बावके, तुषार सदाफळ, साकूरी गावच्या सरपंच मेघना दंडवते, संदीप दंडवते, उपसरपंच रावसाहेब बनसोडे, दत्तात्रय वाघ, मदन तारगे, भागवत बोठे, गणेश सदाफळ, सागर सदाफळ, अनिल बोठे, सुभाष बोठे, प्रसाद बोठे, रोहित सदाफळ, प्रवीण डांगे, दिलीप सदाफळ, सुनील चौधरी आदींनी त्यात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT