Former Trustee of Sai Sansthan Ashok Khambekar passes away 
अहिल्यानगर

साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांचे निधन

मनोज जोशी

कोपरगाव : श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त, जेष्ठ पत्रकार अशोक भीमाशंकर खांबेकर (65) यांचे नाशिक येथे निधन झाले. साईबाबा संस्थांनचे ते वीस वर्षे तर कानिफनाथ देवस्थान ( मढी) व कोपरगाव येथील भवानी मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त होते. खांबेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

कॉंग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे व कॉंग्रेस पक्षाचे ते खंदे समर्थक होते. नवशक्ती, तरुण भारत, नवा काळ ,देवगिरी तरुण भारत, प्रभात अशा दैनिक वृत्तपत्रासह पीटीआयचे पत्रकार म्हणूनदेखील त्यांनी अनेक वर्षे सेवा दिली.

जिल्हातील पत्रकारितेत कै. खांबेकर यांचे मोठे योगदान होते. साई संस्थानच्या माध्यमातून त्यांचा देश विदेशातील भाविकांशी दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी आपल्या पत्नीला नगरसेविका, उपनगराध्यक्ष ते प्रभारी नगराध्यक्ष बनवण्यात मदत केली. स्व. खांबेकर यांना प्रशासकीय सेवेतील अधिकारी, पदाधिकारी व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल, त्यांचे कौटुंबिक इतिहास तोंडपाठ असायचा. त्यामुळे चालते बोलते संगणक म्हणून ते ओळखले जात.

गेल्या तीन आठवड्यपासून ते कोरोना संसर्गाने आजारी होते. मात्र, नाशिक येथे खाजगी रुग्णालयांत उपचार सुरु असताना आज दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आमदार अशुतोष काळे, संजीवनीचे बिपीन कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शिवसेनेचे नितीन औताडे यांनी शोक व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT