This formula of Jayakwadi causes Marathwada struggle against Nagar-Nashik 
अहिल्यानगर

जायकवाडीतील पाण्याच्या या सूत्रामुळे पेटतो नगर-नाशिक विरूद्ध मराठवाडा संघर्ष...मेंढेगिरी समिती काय सांगते

सतीश वैजापूरकर

संघर्ष सोडविण्याची संधी! 
जायकवाडीत 65 टक्के साठा झाल्यावर पाणी सोडण्याची गरज नाही 

सतीश वैजापूरकर : सकाळ वृत्तसेवा 
शिर्डी, ता. 18 ः जायकवाडी जलाशय पाच वर्षांच्या कालखंडानंतर यंदा प्रथमच शंभर टक्के भरेल. वरच्या बाजूची धरणेदेखील भरणार आहेत. यंदा नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा, असा संघर्ष होणार नाही. हे सुगीचे वर्ष आहे, हे लक्षात घेऊन जायकवाडी धरणात 65 टक्के पाणीसाठा झाला, की त्याच तारखेला वरच्या बाजूच्या धरणांतून पाणी सोडावे लागणार नाही, असे जाहीर व्हावे. ही महत्त्वाची दुरुस्ती यंदा करावी, अशी या वादात तटस्थ भूमिका बजावणाऱ्या जाणकारांची अपेक्षा आहे. 

जायकवाडी जलाशयातून 53 हजार हेक्‍टर आठमाही क्षेत्राला पाणी कागदोपत्री मंजुरी आहे. हा जलाशय आठमाही आहे. प्रत्यक्षात येथील लाभक्षेत्रात सव्वा लाख हेक्‍टर पिके उभी आहेत. त्यातील उघड गुपित असे, की त्यात उसासारख्या बारमाही पिकाचे क्षेत्र अधिक आहे. आठमाही जलाशयावर येथे हजारो एकर क्षेत्रात उसासारख्या बारमाही पिकांचे मळे फुलतात. त्यासाठी पाण्याचा वारेमाप उपसा वर्षभर सुरू असतो. 
मेंढेगिरी समितीचे नियम किंवा निकषानुसार या जलाशयात 15 ऑक्‍टोबरपर्यंत 65 टक्के पाणीसाठा झाला, की वरच्या बाजूच्या धरणांतून इकडे पाणी सोडण्याची आवश्‍यकता राहत नाही. हा निकष सोपा आणि साधा वाटत असला, तरी त्यातील 15 ऑक्‍टोबर ही तारीख मोठी अडचण निर्माण करते. या हजारो हेक्‍टर क्षेत्रातील उसासाठी ऑगस्ट ते ऑक्‍टोबरदरम्यान जलाशयातील पाणीवापर करण्याची वेळ येते. त्या वर्षी पाणीसाठ्यात मोठी घट येते. 10-15 टीएमसी पाण्याचा वापर झाला, जलाशयाची पाणीपातळी 15 ऑक्‍टोबरपर्यंत तेवढी खालावली, नेमका त्या वर्षी पाणीसाठा कमी असला, तर या तीन महिन्यांतील वापरले गेलेले पाणीही वरच्या बाजूच्या धरणांतून विनाकारण सोडण्याची वेळ येते. त्यामुळे वरच्या बाजूच्या धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होतो. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. 
आठमाही जलाशयातून बारमाही पिकांसाठी उपसा करायचा. त्यातून निर्माण झालेली घट भरून काढण्यासाठी वरच्या बाजूच्या धरणांतून पाणी सोडायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली, की नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, असा संघर्ष सुरू होतो. हे लक्षात घेऊन, जायकवाडी जलाशयात ज्या तारखेला 65 टक्के पाणीसाठा होईल, त्या तारखेला वरच्या बाजूच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज नाही, असे जाहीर करायला हवे. 

६५ टक्के भरले की हिशेब पुरा
जायकवाडीतील पाणीसाठा मोजण्याची तारीख 15 ऑक्‍टोबर ठरविण्यात आली. त्यामुळे वरच्या नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय होतो, हे वास्तव आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी जायकवाडी जलाशयात 65 टक्के पाणीसाठा होताच, त्याचा हिशेब त्याच दिवशी गृहीत धरून जाहीर करायला हवा. 
- उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT