Forty percent of school buildings in Jamkhed need to be constructed new
Forty percent of school buildings in Jamkhed need to be constructed new 
अहमदनगर

शाळांत भौतिक सुविधांकडे पाठ

वसंत सानप

जामखेड - तालुक्यातील चाळीस टक्के शाळेच्या इमारती नव्याने उभारण्याची गरज असून निर्लेखन झालेल्या व निर्लेखनास मंजुरी मिळालेल्या २७९ शाळा आहेत. मात्र, बैठकीसाठी अन्य सुविधा नसल्याने या वर्गखोल्यांमधून आजही शाळा भरली जाते. शासनाने शून्य ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. मात्र, याच वेळी भौतिक सुविधांकडे पाठ फिरवल्याचे जामखेड तालुक्यात पहायला मिळते.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १७७ शाळा असून १०८३९ विद्यार्थी ज्ञानार्जन तर ५२१ शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी १७७ शाळांमधून ५९२ वर्ग खोल्या अस्तित्वात आहेत. यापैकी ६७ शाळेतील १७७ शाळा खोल्यांच्या निर्लेखनाला मंजूर मिळालेली आहे. तर ३५ शाळेतील १०२ शाळा खोल्या निर्लेखनास मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील ३२ शाळांमधील ७५ वर्ग खोल्यांचे निर्लेखन झालेले नाही. विद्यार्थ्यांची संख्या पाहता नव्याने १०२ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. मागील दोन वर्षात २१ वर्ग खोल्या मंजूर झाल्या असून या खोल्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

शासनाकडून मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी एकाच योजनेवर दोनदोन वेळा निधी टाकल्याचे अनेक दाखले आहेत. मात्र, शिक्षणासारख्या पवित्र कार्याकरिता लागणारे ज्ञानमंदिर उभारण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने वर्ग खोल्यांच्या मंजुरीची संख्या फारच कमी राहते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन व ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे.

खासगी शाळांकडे ओढा

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला असूनही भौतिक सुविधांच्या अभावामुळे सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकशिक्षकी शाळा, शिक्षकांचे शाळेव्यतिरीक्त सुरू असलेले लहान मोठे चर्चेतील उद्योग पाहून पालक पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवायला धजवत नाहीत. पालक वारेमाप फी भरुन खासगी शाळांची पायरी चढताना दिसत आहेत.

तालुक्यात शाळा खोल्यांची मागणी अधिक आहे. मात्र, दरवर्षी दहा-बारा खोल्यांनाच मंजूरी मिळते. तसेच दरवर्षी नवीन शाळा खोल्यांच्या मागणीच्या संख्येतही भर पडते. त्यामुळे हा अनुशेष भरुन काढणे मोठे आव्हानात्मक आहे. यासाठी धोरणात्मक बदलाची गरज आहे.

- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी जामखेड.

तालुक्यातील एकशे दोन शाळा खोल्यांचा जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. यापैकी क्रमवारीनुसार मंजूरी मिळताच नवीन शाळा खोल्यांची उभारणी होईल आणि ही समस्या निकाली निघेल.

- कैलास खैरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जामखेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT