Accident sakal
अहिल्यानगर

नगर- पुणे महामार्गावर विचित्र अपघात; चार जण जागीच ठार

सकाळ डिजिटल टीम

पारनेर (जि. अहमदनगर) : नगर- पुणे महामार्गावरील पळवे शिवारातील एका हॉटेल समोर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे व ट्रकमधील दोघे अशा चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. आज दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

राजाभाऊ चव्हाण (वय ५०, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम चव्हाण (वय १८), शुभम राजू देशभ्रतार (वय २४, रा. चमेली, ता. काटोल, जि. नागपूर), राहुल मधुकर डोंगरे (वय ३१, रा. सावली. ता. कारंजा, जि. वर्धा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

पुण्याहून नगरकडे जाणारा मालट्रक (एमएच ४० वाय ३६८१) पुढे उभ्या असलेल्या मालट्रकवर आदळला. या दोन ट्रकच्या मध्ये दुचाकी (एमएच २१ बीएल ४६५५) सापडल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. शिवाय, ट्रकचे ब्रेक जोरात दाबल्याने ट्रकमधील लोखंडी अँगल चालकाच्या केबिनमध्ये घुसून त्यात चालक व क्लीनरचा मृत्यू झाला. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT