ahmednagar fire
ahmednagar fire esakal
अहमदनगर

अहमदनगर जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणी चौघांना कोठडी

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : जिल्हा रूग्णालयातील जळीतकांड (ahmednagar district hospital fire case) प्रकरणी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी (police custody) देण्यात आली आहे.

या दुर्घटनेत 11 रूग्णांचा मृत्यू झाला

जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला शनिवारी (ता. 6) आग लागली होती. या दुर्घटनेत 11 रूग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्वतः ही कारवाई केली. तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रिजवान अहमद मुजावर यांनी सरकारच्या वतीने फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी प्रारंभी तपास केला. त्यानंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना मंगळवारी (ता.9) अटक करण्यात आली. तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या चार ही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT