Four water supply schemes in Shevgaon taluka have been shut down
Four water supply schemes in Shevgaon taluka have been shut down 
अहमदनगर

शेवगाव - पाणीपुरवठा करणाऱ्या चार योजना बंद; भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : जायकवाडीतून शेवगाव तालुक्‍यातील गावांना चार योजनांद्वारे पाणीपुरवठा होतो. या योजनांची वीजबिल थकबाकी सहा कोटी 62 लाखांच्या घरात गेल्याने, महावितरणाने वीजपुरवठा तोडला. त्यामुळे चार पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायती व नगरपालिकांना त्याचे घेणे-देणे नसल्याने, नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. 

महावितरणाच्या पथकाने थकबाकीचे कारण पुढे करीत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. 16) सायंकाळी चारच्या सुमारास शेवगाव-पाथर्डी व 54 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या, दहिफळ येथील जॅकवेल, खंडोबामाळ, अमरापूर पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. या योजनेची दोन कोटी 49 लाख सात हजार रुपये थकबाकी आहे. 

शहरटाकळी व 24 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना ज्ञानेश्‍वर संयुक्त पाणीपुरवठा समिती चालविते. या योजनेच्या, कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची थकबाकी एक कोटी आठ लाख रुपये (मागील) व 34 लाख 92 हजार रुपये (चालू) आहे. हातगाव व 28 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. योजनेचे काम अपूर्ण असल्याने, कांबी व हातगावसह फक्त 12 गावांना अधूनमधून पाणीपुरवठा होतो. या योजनेच्या, कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची मिळून थकबाकी 1 कोटी 73 लाख रुपये आहे. तर 77 लाख 52 हजार रुपये चालू बाकी आहे.
 
बोधेगाव व सात गावे ही योजना संबंधित ग्रामपंचायतींतील सदस्यांच्या समितीमार्फत चालविली जाते. तिचे अध्यक्ष बोधेगावचे उपसरपंच नितीन काकडे आहेत. या योजनेच्या, कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व सोनेसांगवी येथील पंपहाऊसची थकबाकी 1 कोटी 13 लाख रुपये, तर चालू बाकी 38 लाख 88 हजार रुपये आहे. या योजनेची वार्षिक वसुली 17 लाख आहे. मात्र, या वर्षी फक्त 13 लाख 500 रुपये वसुली झाली. 

शेवगाव-पाथर्डी योजनेची थकबाकी 

शेवगाव नगरपालिका- 2 कोटी 80 लाख 60 हजार 815 रुपये, पाथर्डी नगरपालिका- 87 लाख 28 हजार 335 रुपये, शेवगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायती- एक कोटी 87 लाख 66 हजार 456 रुपये, पाथर्डी तालुक्‍यातील ग्रामपंचायती- एक कोटी नऊ लाख 94 हजार 990 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT