Fourteen people were killed by lightning 
अहिल्यानगर

विजेने घेतला चौदा जनावरांचा बळी

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका ः दोन दिवसांपासून नगर तालुक्‍यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळिराजा सुखावला असला, तरी खातगाव येथील मेंढपाळावर मात्र मोठे संकट कोसळले. या परिसरात वीज पडल्याने 14 शेळ्या, मेंढ्या व कुत्र्याचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाचे पावणेदोन लाखांचे नुकसान झाले.

संतोष पवार (रा. खातगाव, ता. नगर) हे नेहमीप्रमाणे शेळ्या व मेंढ्या चारण्यासाठी खातगाव ते निमगाव घाणा रस्त्यावर घेऊन गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. पावसामुळे जनावरे सैरावैरा पळायला लागल्याने पवार यांनी सर्व जनावरे परिसरातील एका बाभळीच्या झाडाखाली आणली. 

झाडाच्या आडोशाला जनावरांसह तेही उभे होते. परंतु जनावरे भुकेलेली होती. त्यामुळे शेळ्या पावसात जाऊ लागल्याने पवार यांनी बाभळीच्या फांद्या तोडून त्यांना खाऊ घालत होते.

दरम्यान विजांचा कडकडाट होऊन बाभळीच्या झाडांच्या परिसरात अचानक वीज पडली. यामध्ये पवार यांच्या सहा मेंढ्या, सात शेळ्या व एक पाळीव कुत्रा अशी 14 जनावरे मृत्युमुखी पडली. तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. यामध्ये पवार यांचे पावणेदोन लाखांचे नुकसान झाले. तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद राजळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT