The Gadakh brothers also opened a library at the Ministry 
अहिल्यानगर

गडाख बंधूंनी मंत्रालयालाही लावले वाचनवेड!

सुनील गर्जे

नेवासे : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या रुपाने नेवासे तालुक्याला राज्य मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर एरवी रुक्ष वाटणारे मृद व जलसंधारण मंत्रालय यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी स्वतः लक्ष घालून कल्पकतेने लोकाभिमुख बनवले आहे.

मंत्री गडाख यांना मंत्रालयात मिळालेल्या दालनाची अंतर्गत सजावट त्यांनी आकर्षक तर केलीच परंतु अवागतांसाठी छोटेसे वाचनालयही थाटल्याने मंत्रालयातील हे दालन मंत्रीमंडळात चर्चेचा विषय बनले आहे. 

नेवाशाचे लोकप्रतिनिधी शंकरराव गडाखांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्याबरोबर प्रशांत पाटील गडाख हे मंत्रालयातील त्यांना मिळालेल्या दालनात आले, तेव्हा दालनाची स्थिती वेगळी होती. ही अवस्था पाहून मंत्री गडाखांनी प्रशांत गडाखांना दालनाच्या अंतर्गत सजावटीची जबाबदारी सोपवली.

स्टाफमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, येणाऱ्या जनतेला तिथे प्रसन्न वाटावे या कल्पकतेने प्रशांत पाटलांनी आर्किटेक्टला सूचना देऊन डिझाईन तयार करण्यास सांगितले. त्याचबरोबर बऱ्याचदा मंत्री गडाख हे कामात व्यस्त असल्यावर जनतेला प्रतिक्षा करावी लागते. त्यासाठी एक छोटसं वाचनालयही तिथं करायला सांगितले. 
हा बदल केल्यानंतर कोरोनामुळे लॉकडाउन लागले. त्यानंतर प्रशांत गडाख हे  मंत्रालयातील आले असता त्यांनी दालनातील बदल पाहून समाधान व्यक्त केले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत नेवासे तालुक्यातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावाही घेतला. महाराष्ट्राचा व्याप मंत्री गडाखांपुढे असतांनाही ते तालुक्याकडे जातीने लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे यंत्रणेतील त्रुटी अजून कशा कमी होतील याबाबत अधिकारी वर्गाशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.
 

यशवंतची ६५ वाचनालय

ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेतून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी नेवासे तालुक्यात वाचनालय चळवळ सुरू केली. सध्या 'यशवंत'चे ६५ वाचनालये शासन अटी व नियमांचे पालन करून वाचकांसाठी खुली करण्यात आली आहेत. दरम्यान लॉकडाऊन काळात  ग्रंथदूत संकल्पना राबवून वाचकांना घरपोहोच ग्रंथ, पुस्तक देण्याचा उपक्रम यशवंत वाचनालयांनी राबविला होता. 

नगर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचेही ते मुख्य आयोजक यशवंतराव गडाख पाटील होते. त्यांना वाचनाची जशी आवड आहे, तसाच त्यांच्या पुस्तकांचाही संग्रह मोठा आहे. त्यांचे स्वतःचे असे सुसज्ज वाचनालय आहे. त्यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना अनोखी भेट दिली.

ज्ञानेश्‍वरांनी नेवासे येथे ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, त्या ज्ञानेश्वर मंदिरातील पैस खांबाला साक्षी ठेवून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्याचा संकल्प सोडला. त्या दिवशी नेवासे तालुक्यातील जुनी बंद पडलेली ५१ वाचनालये पुन्हा सुरू करण्यात आली. प्रत्येक वाचनालयाला १०५ पुस्तके देण्यात आली होती. उपक्रम सुरू होऊन अवघे सहा महिने झालेले असताना आणखी नवीन ५० वाचनालये सुरू करण्यात आली.

"मंत्री शंकरराव गडाखांकडे कामानिमित्त व भेटीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंत्री महोदय व  अधिकारी  यांच्या महत्त्वाच्या नियोजन  बैठका असल्याने अनेकांना दालनात प्रतीक्षेत बसावे लागते. त्यांचा पुस्तकांच्या सहवासात वेळ व्यतीत व्हावा. याच उद्देशाने तेथे वाचनालय सुरू केले. 
- प्रशांत पाटील गडाख, अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान. 

"प्रशांत पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री शंकरराव गडाख यांच्या  मंत्रालयातील दलनाचे सुशोभीकरण करण्यात तर आलेच मात्र त्यांच्या संकल्पनेतून या दालनात वाचनालय सुरू करण्यात आले.  मंत्र्याच्या दालनात वाचनालय  याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 
- विजय कारंडे, शासकीय स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT