अहिल्यानगर

पाथर्डीतील गणेशमूर्तींची लंडनला वारी! मागणी वाढल्याने दरही चांगला

राजेंद्र सावंत

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना चांगली मागणी असून, दरही उत्तम मिळतो आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : शहरात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना (ganesha idols) विदेशातून मागणी आहे. नुकत्याच एक हजार मूर्ती लंडनला (London) पाठविण्यात आल्या आहेत. विदेशातून मागणी (Demand) वाढल्याने दरही चांगला मिळत आहे. (ganesha idols in pathardi are in demand from london)

शहरातील मूर्तींना लंडन, थायलंड व मॉरिशस येथून मागणी आहे. लॉकडाउन असतानाही मागणी कमी न होता वाढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना चांगली मागणी असून, दरही उत्तम मिळतो आहे. येथील रघुनाथ पारखे १९७० पासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात. त्यांना मुलगा संजय व नातू अनिल मदत करतात.

अनिल यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेतून शिल्पकलेची पदवी घेतली आहे. काळ बदलला तसा गणपती तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. आता थ्रीडी कलर गणशमूर्तींची नवी संकल्पना पुढे येत आहे. रंग देण्यासाठी आधुनिक यंत्र वापरले जात आहेत. त्यामुळे पारंपरिक कलेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागत आहे. पारखे यांनी या वर्षी एक हजार गणेशमूर्ती लंडन येथे पाठविल्या आहेत. मागील वर्षी त्यांनी थायलंड व मॉरिशस येथे मूर्ती पाठविल्या होत्या.

मी शिल्पकलेचे शिक्षण मुंबई येथे घेतले आहे. गणेशमूर्तींना बाजारपेठ मिळावी, यासाठी काम करतो. या वर्षी लंडनमधील अनिवासी भारतीयांकडून एक हजार मूर्तींची मागणी आली होती. ठाणे येथील मित्रांच्या मध्यस्थीने मूर्ती लंडनला पाठविल्या.

- अनिल पारखे, गणेश मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT